घरमहाराष्ट्रहा विजय माझा नाही तर माझे पती रमेश लटके यांचा; ऋतुजा लटकेंची...

हा विजय माझा नाही तर माझे पती रमेश लटके यांचा; ऋतुजा लटकेंची पहिली प्रतिक्रिया

Subscribe

अंधेरी पूर्व पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटकेंचा विजय झाला आहे. आता केवळ विजयी उमेदवाराची औपचारिक घोषणा बाकी आहे. ऋतुजा लटके यांनी विजयानंतर आज अधिकृतपणे पत्रकार परिषद घेत आपली भूमिका मांडली आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या सर्व कार्यकर्त्यांचे विशेषत: ठाकरे गटाचे आभार मानले आहे. तसेच हा विजय माझा नाही तर माझे पती रमेश लटके यांचा असल्याची पहिली प्रतिक्रिया ऋतुजा लटके यांनी दिली आहे. (rutuja latke first reaction after win andheri bypoll election 2022)

ऋतुजा लटके म्हणाल्या की, हा विजय माझा नाही तर माझे पती रमेश लटके यांचा आहे. त्यांनी पूर्ण राजकीय कारकीर्दीत जी जनसेवा केली त्याची पोचपावती म्हणजे हा विजय आहे. मतदारांनी त्याचीचत परतफेड केली आहे.

- Advertisement -

भाजपने उमेदवार मागे घेतला तरी त्यांनी नोटा पर्याय निवडण्याचे आवाहन केले होते, नोटाचं बटण का दाबलं हा प्रश्न तुम्ही मतदारांना विचारला पाहिजे. माझं पहिलं काम हेच आहे की, रमेश लटके यांची जी कामं अर्धवट राहिली आहेत. त्यांनी ज्यांना कामाचं आश्वासन दिलंय ते पूर्ण करणार आहे. माझी पहिली प्राथमिकता तीच असेल, त्यांचा ध्यास अंधेरीचा विकास हाच होता. मी देखील तितक्याच प्रयत्नाने विकासाचा प्रयत्न करेन असा विश्वास ऋतुजा लटके यांनी व्यक्त केला,

यावेळी ऋतुजा लटके यांनी जनतेसह, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे, शिवसेना नेते अनिल परब यांचे आभार मानले. ऋतुजा लटके पुढे म्हणाल्या की, मी महाविकास आघाडीची उमेदवार आहे. त्यामुळे मी मातोश्रीवर जाणारच आहे. पण मविआच्या प्रत्येक कार्यकर्त्यांचे मी आभार मानते.

- Advertisement -

ही पोटनिवडणूक आहे. माझ्या पतीचं निधन झालं, माझं एक दु:ख आहे की मला माझ्या पतीच्या जागेवर निवडणूक लढवाली लागली. नोटाला झालेले मतदान हे भाजपला मिळालेली मतं आहेत. त्यांच्यात सहानुभूतीची भावना असती तर त्यांनी आधीच उमेदवार जाहीर केला नसता, असही ऋतुजा लटके म्हणाल्या.


आगामी निवडणुकीत प्रत्येक पक्षाला त्यांची जागा दाखवून देऊ; अनिल परबांचे विरोधकांना आव्हान

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -