Saturday, June 10, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र संभाजी भिडे टिकलीवरून अमृता फडणवीसांना बोलू शकतील का? सुषमा अंधारेंचा फडणवीसांना सवाल

संभाजी भिडे टिकलीवरून अमृता फडणवीसांना बोलू शकतील का? सुषमा अंधारेंचा फडणवीसांना सवाल

Subscribe

आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे सातत्याने चर्चेत असलेले ‘शिवप्रतिष्ठान’चे संस्थापक संभाजी भिडे एका महिला पत्रकाराला टिकली न लावण्यावरून केलेल्या आक्षेपार्ह विधानावरून पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले. याच प्रकरणावरून आज ठाकरे गटाच्या आक्रमक नेत्या सुषमा अंधारे यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल केला आहे. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३ (१९) ने प्रत्येकाला व्यक्तिस्वातंत्र्य दिले आहे. तरी सुद्धा माध्यमप्रतिनिधी टिकली लावत नाही म्हणून एका महिला पत्रकाराशी अत्यंत असभ्य पद्धतीने बोलणारे संभाजी भिडे यांच्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक शब्दही बोलले नाही. पण संभाजी भिडे अमृता फडणवीस यांना टिकलीवरून बोलण्याची हिंमत करतील का? असा थेट सवाल सुषमा अंधारे यांवी देवेंद्र फडणवीस यांना केला आहे. सुषमा अंधारे आज पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होत्या. (Sambhaji Bhide talk to Amruta Fadnavis about Tikli Sushma Andhare direct question to dcm devendra Fadnavis)

भिडेंचा एकतर महिलांकडे बघण्याचा दृष्टीकोनचं वाईट आहे आणि त्यात कोणत्या महिलांबद्दल बोलावे याचा त्यांना परवानाच मिळाला आहे. असा आरोप सुषमा अंधारे यांनी केला आहे.

लोकप्रतिनिधी निवडतो की पोरी पळवणारा प्रतिनिधी

- Advertisement -

सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या की, हाथरस प्रकरणात पोलिसांनी पीडितांचे शव जाळण्याचे काम केले त्यावर भाजपने चकार शब्द उच्चारला नाही. त्यामुळे भाजप कशाप्रकारे जनतेचा आवाज दडपते याचे हे तिसरे उदाहरण आहे. याचप्रद्धतीने महाराष्ट्रातील भाजपचे आमदार आणि प्रवक्ते राम कदम यांनी दहिहंडीच्या कार्यक्रमात केलेले वक्तव्य.. ज्यात ते म्हणाले होते की, तुम्हाला कोणती पोरगी आवडते ते सांगा मी ती मुलगी उचलून आणून देतो… आम्ही लोकप्रतिनिधी निवडतो की आम्ही पोरी पळवणारा प्रतिनिधी निवडतो म्हणत सुषमा अंधारे भाजप नेते राम कदम यांच्यावर टीकास्त्र डागले.

भाजपकडून निवडणूक लढलेले परिकारचं वीर जवानांच्या पत्नीबाबतचं अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य करतात, तेही पब्लिक डोमेनवर आहे. भाजपच्या सोलापूर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्षाच्या संबंधाने एका मायमाऊलीने आपल्या जीवावर हे लोक कसे उठले आहे हे स्पष्ट केलं आहे. याच भाजपचे सरकार आत्ता सत्तेत आहे, मागेही संभाजी भिडे यांनी अत्यंत वादग्रस्त वक्तव्य केली होती. पाच सहा दिवसांपूर्वी संभाजी भिडे यांनी एका महिला पत्रकारासोबत अत्यंत असभ्य आणि अश्लाघ्य पद्धतीचे वर्तन केले. जर त्यांचे म्हणणे असेल कोणी काय लिहावे, कोणी काय नेसावे, कोणी कसे बोलावे, कोणती भाषा बोलावी हा ज्याचा त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न आहे. असही सुषमा अंधारे म्हणाल्या.


भारत जोडो यात्रेत काँग्रेस पदाधिकाऱ्याचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

- Advertisement -
- Advertisement -
sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -