Goa Election: …तर गोव्यात उत्पल पर्रिकरांना शिवसेना ताकद देणार, संजय राऊतांचा पवित्रा

गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या कुटुंबाने हिंदुत्ववादी म्हणून शिवसेनेसोबत संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असे संजय राऊत म्हणाले आहेत.

sanjay raut said shivsena gave chance to utpak Parrikar for contest Goa Assemble Election 2022
Goa Election: ...तर गोव्यात उत्पल पर्रिकरांना शिवसेना ताकद देणार, संजय राऊतांचा पवित्रा

गोव्यात विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. गोव्यात शिवसेनेकडून जोरदार तयारी करण्यात येत आहे. गोव्यातही महाविकास आघाडी सारखा प्रयोग करण्याचा प्रयत्न असल्याचे शिवसेना खासदार संजय राऊत यांनी सांगितले आहे. तसेच गोव्याची दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या मुलाला शिवसेनेत घेणार का? असा सवाल राऊतांना विचारला होता. यावर राऊत म्हणाले की, गोव्यात उत्पल पर्रिकरांनी हिंमत दाखवल्यास शिवसेना ताकद पणाला लावेल. राजकारणात काही धाडसी निर्णय घ्यावे लागतात असे संजय राऊत म्हणाले आहेत. उत्पल पर्रिकरांनी हिंमत दाखवल्यास त्यांना भक्कम साथ देऊ असे राऊतांनी स्पष्ट केलं आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी राऊतांना उत्पल पर्रिकर यांना शिवसेनेत घेणार का? असा प्रश्न विचारण्यात आला होता. यावर राऊत म्हणाले की, दादरा नगर हवेलीमध्ये लोकसभा निवडणूक जिंकलो आहोत. दिवंगत मोहन डेलकर यांचे कुटुंब शिवसेनेत आले आणि आम्ही ताकद लावून निवडणूक लढलो. जर गोव्याचे दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांच्या कुटुंबाने हिंदुत्ववादी म्हणून शिवसेनेसोबत संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच शिवसेना त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहील असे संजय राऊत म्हणाले आहेत.

उत्पल परर्रिकर यांनी हिंमत दाखवायला हवी. त्यांच्या वडिलांनी गोव्यात भाजप पक्ष रुजवण्याचा प्रयत्न केला. गोव्यात भाजपला स्थान निर्माण करुन दिले आहे. त्यांच्याच प्रतिमेवर भाजप गोव्यात टीकला आहे नाहीतर आयाराम गयारामांवर भाजप पक्ष टीकला होता. पण उत्पल पर्रिकरांना धाडसाने काही निर्णय घ्यावे लागतील. शिवसेना हा हिंदुत्ववादी पक्ष आहे. भाजपला मुख्य पर्याय म्हणून शिवसेनेकडे पाहतील असे संजय राऊत म्हणाले.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर राऊतांचा घणाघात

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत जमिनीवर ४ हात चालत आहेत त्यांना आपल्या शुभेच्छा असल्याचे राऊत म्हणाले. शिवसेनेला गोव्यात काय महत्त्व आहे? असे सावंत यांनी केलेल्या वक्तव्यावर संजय राऊतांनी घणाघात केला आहे. भाजपला गोव्यात कधी काळी लोक विचारतही नव्हते. पंरतु येणारा काळच ठरवेल गोव्यात शिवसेनेला महत्त्व आहे की, भाजपला? असे राऊत म्हणाले.

गोव्याच्या मुख्यमंत्र्यांवर राऊतांचा घणाघात

आम्हाला असं वाटत की, गोव्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस असा प्रयोग करावा, महाराष्ट्रात जसे निवडणूकांनंतर आघाडी करण्यात आली तशीच गोव्यात निवडणुकांपूर्वी करण्यात यावी, यासाठी प्रयत्न करण्यात आले. राष्ट्रवादीचे प्रमुख नेते प्रफुल्ल पटेलसुद्धा प्रयत्न करत होते. काँग्रेसला वाटत आहे की, ते गोव्यात सत्ता आणू शकतात यामुळे त्यांनी तसे संकेत दिल्लीत दिले असतील. आम्हालाही काही जागा ऑफर केल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत आहे त्यामुळे एकत्र निर्णय घेतला पाहिजे. शिवसेना साधारण ठरल्याप्रमाणे राष्ट्रवादी आणि अन्य स्थानिक पक्षांसोबत निवडणुका लढवणार. उत्तर प्रदेशमध्येही निवडणूक लढवणार असल्याचे राऊत म्हणाले आहेत.


हेही वाचा : Assembly election : कोरोनाच्या संकट असताना कोणाला तरी निवडणूक घेण्याची घाई, संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा