Sunday, September 19, 2021
27 C
Mumbai
घर ताज्या घडामोडी आमचीही अपेक्षा, पंतप्रधानांनी हेलिकॉप्टरनं गिरकी घालून हजार कोटी द्यावे, संजय राऊतांचा टोला

आमचीही अपेक्षा, पंतप्रधानांनी हेलिकॉप्टरनं गिरकी घालून हजार कोटी द्यावे, संजय राऊतांचा टोला

विरोधी पक्षातील नेते मोकळे आहेत, मोकळा माणूस असतं डोक रिकामं असते असे आरोप करत असतात - संजय राऊत

Related Story

- Advertisement -

राज्यातील पूरग्रस्त भागातील नुकसानग्रस्तांच्या मदतीवरुन सत्ताधारी आणि विरोधकांविरोधात आरोप-प्रत्यारोप आणि टीका करत आहेत. विरोधकांनी राज्य सरकारने मदत जाहीर करावी अशी मागणी केली आहे. तर सत्ताधारी केंद्रानेही भरीव मदत करावी अशी मागणी करत आहेत. यावर शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधकांना टोला लगावला आहे. आमचीही अपेक्षा आहे की, पंतप्रधान मोदींनी यावे हेलिकॉप्टरनं गिरकी मारावी आणि पूरग्रस्तांना १००० कोटी रुपयांची मदत करावी असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच विरोधक मोकळे असून त्यांचं डोकं रिकामं असल्याची टीकाही केली आहे.

नगर जिल्ह्यात ऑक्सिजन प्लान्टच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमासाठी संजय राऊत उपस्थित होते. यावेळी संजय राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. संपुर्ण राज्यामध्ये गावपातळीवर संपर्क अभियान सुरु आहे. त्याच्या समारोपाचा काळ आला आहे. सरकार असले तरी पक्षाचे संघटन अधिक मजबूतीनं व्हाव अशी भावना आहे. या जिल्ह्यामध्ये शंकरराव गडाख आल्यापासून पक्ष वाढतो आहे. कार्यकर्त्यांना बळ मिळतं आहे. या जिल्ह्याची ओळख शिवसेनेचा जिल्हा म्हणून व्हावा अशी ओळख निर्माण करण्यासाठी तशा प्रकारचं काम इथे व्हावे यासाठी सगळे प्रयत्न करत असल्याची माहिती संजय राऊत यांनी दिली आहे.

- Advertisement -

पूरग्रस्त भागातील नागरिकांना मागील सरकारच्या काळात तात्काळ मदत केली होती. मात्र ठाकरे सरकार मदत जाहीर करत नाही अशा टीका करण्यात आल्या होत्या यावर संजय राऊत यांनी म्हटलं आहे की, विरोधी पक्षातील नेते मोकळे आहेत, मोकळा माणूस असतं डोक रिकामं असते असे आरोप करत असतात, त्यांनीसुद्धा सरकार चालवलं आहे. आमची आपेक्षा आहे की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावं हेलिकॉप्टरने एक गिरकी मारावी आणि राज्याला हजार कोटी रुपयांची मदत द्यावी. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी मदतीसंदर्भात निर्णय घेतले आहेत. सध्या पूरग्रस्तांच्या खात्यात १० हजार रुपयांची मदत जमा करण्यात येत आहे. पंचनामे झाल्यावर अधिक मदत दिली जाईल

पक्ष वाढवण्याचा प्रत्येकाला अधिकार

राज्य सरकामध्ये समन्वयाचा अभाव असल्याचे विरोधी पक्षनेत्यांनी म्हटलं आहे. यावर संजय राऊत म्हणालेकी, समन्वयाचा अभाव, हा समन्वय काय असतो. तीन पक्ष स्वतंत्रपणे काम करतायत ते करत राहतात. प्रत्येक पक्ष आपल्या पद्धतीने वाढत असतो. शरद पवार यांनी म्हटलं आहे सरकार एकत्र चालवण्याचे ठरवले आहे. पण पक्ष एकत्र चालवण्याचे ठरवले नाही. प्रत्येक पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचे अधिकार आहेत. जेव्हा शिवसेना-भाजपची युती होती तेव्हा दोन्ही पक्ष शत-प्रतिशत चे नारे देतच होते यामध्ये काय चुकले? असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला आहे.

सरकार ५ वर्ष पुर्ण करणार

- Advertisement -

महाविकास आघाडी सरकार अंतरवादामुळे पडणार असल्याचे वक्तव्य फडणवीस यांनी केलं आहे. मात्र हे सरकार उरलेला तीन वर्षाचा काळ अगदी व्यवस्थित पार पाडणार आहे. यामुळे उरलेल्या या तीन वर्षांच्या काळामध्ये कोणी पुन्हा येण्याची शक्यता नाही. भविष्यामध्ये सुद्धा आजचीच व्यवस्था कायम राहील याची खात्री असल्याचे संजय राऊत यांनी सांगितले.

- Advertisement -