घरमहाराष्ट्रनाणार भोवतालच्या जमिनी घेतलेल्यांची नावं जाहीर करा, अन्यथा...; राऊतांच शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान

नाणार भोवतालच्या जमिनी घेतलेल्यांची नावं जाहीर करा, अन्यथा…; राऊतांच शिंदे-फडणवीस सरकारला आव्हान

Subscribe

नाणारच्या आसपासच्या जमिनींमध्ये कुणाला पैसा गुंतला आहे? ही गुंतवणुक कुणाची आहे? ही गुंतवणुक कुठून आली? गुंतवणूकदार कोण आहेत? यात कोणाचा पैसा आहे? याची माहिती, यादी राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर करावी, अन्यथा ही यादी आम्ही जाहीर करु, असा इशारा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिला आहे. महाराष्ट्रात नाणार प्रकल्प आणणारचं या सरकारच्या भूमिकेवरही राऊतांनी टीकास्त्र डागलं आहे,

राऊत म्हणाले की, काल त्यांनी जे कालं ‘च’ वर जोर देऊन सांगितलं आणणारचं… तेथील जनतेच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत कारण एखाद्या उद्योगपतीला किंवा परदेशी कंपनीला कॉन्ट्रॅक्ट देण्यासाठी भाजप ‘च’वर जोर देऊन आणणारचं, करणारचं, असं सांगत आहे, त्यातून काय झाली देशाची अवस्था आपण पाहतोय. ते ‘च’ वर जोर देऊन चालणार नाही.

- Advertisement -

ज्यांनी नाणारच्या अवती भवती जमिनी घेतल्या त्यांची नावं देवेंद्र फडणवीसांनी जाहीर करा. नाणारच्या अवतीभवती ज्यांच्या जमिनी आहेत, ज्यांनी अलीकडच्या काळात घेतल्या आहेत त्या जमिनदारांसाठी नाणार प्रकल्प आणला जात आहे. ही गुंतवणुक कुणाची आहे? ही गुंतवणुक कुठून आली? गुंतवणूकदार कोण आहेत? हा कोणाचा पैसा आहे? नाणारच्या आसपासच्या जमिनीमध्ये कुणाला पैसा गुंतला आहे? ही माहिती राज्याचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री, मुख्यमंत्री यांनी जाहीर करावी, नाहीतर ही यादी आम्ही जाहीर करु, मग जोर देऊन सांगावं आम्ही आणणारच, असा टोलेवजा इशारा आज राऊतांनी दिला आहे.


कसब्यात काँग्रेस तर चिंचवडमध्ये राष्ट्रवादी लढणार निवडणूक, पुण्यात मविआविरुद्ध भाजप 

sushma rane
sushma ranehttps://www.mymahanagar.com/author/sushma-rane/
गेली ४ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात काम करण्याचा अनुभव, मनोरंजन लिखाण, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -