घरमहाराष्ट्रसंजय राऊतांचा दीपक केसरकरांबाबत खळबळजनक दावा, म्हणाले - "शिंदेच्या पाठीत खंजीर खुपसून..."

संजय राऊतांचा दीपक केसरकरांबाबत खळबळजनक दावा, म्हणाले – “शिंदेच्या पाठीत खंजीर खुपसून…”

Subscribe

दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला असून केसरकरांबाबत खळबळजनक दावा केला आहे. केसरकर कोण आहेत? अशी टीका राऊतांनी केली आहे.

मुंबई : यंदाच्या वर्षी दादरमधील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे शिवसेनेच्या कोणत्या गटाचा दसरा मेळावा होणार हे स्पष्ट झालेले नाही. परंतु शिवसेनेच्या शिंदे गटाचे प्रवक्ते असलेले दीपक केसरकर यांनी शिंदे गटाचा दसरा मेळावा हा ओव्हल मैदानावर घेण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. पण दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला असून केसरकरांबाबत खळबळजनक दावा केला आहे. केसरकर कोण आहेत. सावंतवाडीच्या मोती तलावाजवळ बसलेले ते डोमकावळे आहेत, अशी टीका संजय राऊत यांच्याकडून करण्यात आलेली आहे. प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत यांनी केसरकरांवर टीकेची झोड उठवली. (Sanjay Raut’s sensational claim about Deepak Kesarkar)

हेही वाचा – टोलच्या मुद्द्यावरून मनसे आक्रमक पण, मुंबईकरांना 2027 पर्यंत टोलपासून मुक्ती नाहीच

- Advertisement -

यावेळी बोलताना संजय राऊत म्हणाले की, कोणत्याही टोळीकडून दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेचा म्हणून बीएमसीकडे किंवा सरकारकडे मागणी केली असेल तर त्याने आपण खरंच शिवसेना आहोत का? हे जाणून घेण्यासाठी स्वतःला आरशात पाहावे. आपल्या मनाला विचारावे की आम्ही खरंच शिवसेना आहोत की आम्ही लफंगेगिरी करत आहोत. भाजप आणि दिल्लीच्या नादाला लागून. शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची आहे. या महाराष्ट्राच्या 11 कोटी जनतेला हे माहीत आहे. तुम्ही जगाच्या पाठीवर कुठे पण जा आणि विचारा की शिवसेना कोणाची? तर ते ठाकऱ्यांची सांगतील. शिंदे कोण असा प्रश्न करतील. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारांचा आहे. हे सगळेमध्ये उपटसोंबे कोण आले? शिवसेनेचे आणि बाहेरचे. शिवतीर्थावर शिवसेनेचा मेळावा होणार. तुम्ही आधी अर्ज केला हे कसले धोरण, असा टोला राऊतांनी लगावला आहे.

शिंदे गटाने शिवाजी पार्कमधील दसरा मेळाव्याच्या मुद्द्यावरून माघार घेतली असे बोलले जात आहे. पण मी असे बोलणार नाही. पण हा खेळ नेमका कशासाछी सुरू आहे. दिल्लीच्या मदतीने तुम्ही पक्ष आणि चिन्ह चोरले. आता आणखी चोऱ्या माऱ्या करायला काय शिल्लक राहिले का? अशी टीका संजय राऊत यांच्याकडून करण्यात आली आहे. तर दसरा मेळाव्याच्या माध्यमातून सहानुभूती मिळवण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे वक्तव्य दीपक केसरकर यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार संजय राऊतांनी घेतला आहे.

- Advertisement -

दीपक केसरकर यांनी केलेल्या वक्तव्याबाबत प्रतिक्रिया देताना संजय राऊत म्हणाले की, कोण आहेत केसरकर? त्यांचा शिवसेनेशी संबंध काय? हा सावंतवाडीतल्या मोती तलावावरचा डोमकावळा आहे. त्यांचा शिवसेनेशी संबंध काय? ते ना इथले आहेत ना तिथले आहेत. हा माणूस पदासाठी आणि सत्तेसाठी शिवसेनेत आला. त्यांना उद्धव ठाकरेंनी मंत्री केले त्याला आमचा विरोध होता. हे असे बाहरचे लोक घेऊ नका ते पाठीत खंजीर खुपसून पळून जातील, असे सांगितले होते. त्यांना अर्थमंत्री, गृह राज्यमंत्री, दोनवेळा आमदार आणि ते आम्हाला आता शिवसेना शिकवत आहेत का? हा माणूस एकनाथ शिंदेंच्या पाठीत खंजीर खुपसून भाजपमध्ये जाणार, असा दावा संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -