घरमहाराष्ट्रMaharashtra Heat Wave : वाढत्या तापमानामुळे राज्यातील शाळांना शुक्रवारपासून सुट्टी

Maharashtra Heat Wave : वाढत्या तापमानामुळे राज्यातील शाळांना शुक्रवारपासून सुट्टी

Subscribe

वाढत्या उष्णतेमुळे राज्यातील शाळांना उद्या शुक्रवारपासून म्हणजेच २१ एप्रिलपासून सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून देण्यात आलेली आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानात वाढ ( Maharashtra heat wave) झाल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे वाढत्या उष्णतेमुळे राज्यातील शाळांना उद्या शुक्रवारपासून म्हणजेच २१ एप्रिलपासून सुट्टी देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. राज्य सरकारकडून घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर (Education Minister Deepak Kesarkar) यांच्याकडून देण्यात आलेली आहे. तर ज्या कोणत्या शाळेत महत्त्वाचे असे उपक्रम सुरू असतील त्या शाळांनी त्यांच्या स्तरावर याबाबतचे निर्णय घ्यावे, असे आदेश देखील राज्य शासनाकडून देण्यात आलेले आहेत.

शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्याकडून शैक्षणिक वर्ष पूर्ण झालेल्या शाळांचा अहवाल मागविण्यात आला होता. या अहवालानंतर आणि राज्यात वाढत असलेले तापमान यांमुळे वेळेच्या आधी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. दरवर्षी शाळांना मे महिन्याच्या सुरूवातीला सुट्टी देण्यात येते. परंतु यंदाच्या वर्षी त्याआधीच सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. तर उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने पालकांनी आपल्या पाल्यांची काळजी घ्यावी, असे आवाहन देखील दीपक केसरकर यांच्याकडून करण्यात आलेले आहे.

- Advertisement -

राज्यातील वाढत्या तापमानामुळे पालक वर्ग चिंतेत होता. सीबीएसई आणि इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळा या सकाळच्या सत्रात भरवण्याची शाळा प्रशासन आणि शालेय शिक्षण मंत्र्यांकडे मागणी पालकांकडून करण्यात येत होती. तर खारघरमध्ये उष्माघाताने झालेल्या मृत्यूच्या घटनेनंतर नवी मुंबई पालक संघटना आणि त्यासोबत राज्यातील इतर पालक संघटनांनी सीबीएसई व इतर केंद्रीय बोर्डाच्या शाळा या फक्त सकाळच्या सत्रात सुरू ठेवाव्यात, अशी मागणी केली होती. त्यामुळे देखील शाळांना लवकर सुट्टी देण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे, राज्यातील सर्व शाळांना आता २१ एप्रिल ते १५ जून पर्यंत सुट्टी असणार आहे. तर विदर्भात उन्हाची तीव्रता जास्त असल्याने त्या ठिकाणी ३० जूनला शाळा सुरू करण्यात येणार आहेत, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी गुरूवारी (ता. १९ एप्रिल) दिली.

- Advertisement -

हेही वाचा – उष्माघात टाळण्यासाठी पालघर जिल्हा आरोग्य विभागाकडून मार्गदर्शक सूचना

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -