घरक्राइममोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षेत त्रुटी? ड्रोन उडवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

मोदींच्या मुंबई दौऱ्यात सुरक्षेत त्रुटी? ड्रोन उडवणाऱ्याविरोधात गुन्हा दाखल

Subscribe

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी त्यांच्या मार्गावर ड्रोन उडवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संबंधित इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) नुकतेच मुंबई दौऱ्यावर (Mumbai Visit) आले होते. त्यांच्या सुरक्षेत (Security) कोणत्याही त्रुटी राहु नयेत म्हणून मुंबई पोलिसांनी काळजी घेतली होती. मात्र, आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्याच्या एक दिवस आधी त्यांच्या मार्गावर ड्रोन उडवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी संबंधित इसमाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Security flaws in Modi’s Mumbai tour? Crimes filed against drone pilots)

हेही वाचा – विविध क्षेत्रातून महाराष्ट्राने देशाला प्रेरित केलं – पंतप्रधान नरेंद्र मोदी

- Advertisement -

मंगळवारी, पतंप्रधान नरेंद्र मोदी मुंबई दौऱ्यावर आले होते. देहुतील संत तुकाराम महाराज यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण केल्यानंतर ते मुंबईतील क्रांती गाथा या भुयारी दालनाचे उद्धाटन करण्याकरता मुंबईत आले होते. तेथून ते वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये एका वर्तमानपत्राच्या द्विशताब्दी कार्यक्रमासाठी रवाना झाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा दौरा सुरळीत आणि सुरक्षित व्हावा याकरता मुंबई पोलिसांनी डोळ्यांत तेल टाकून काळजी घेतली होती. मात्र, दौऱ्याच्या एक दिवस आधीच, म्हणजेच सोमवारी दक्षिण मुंबईमध्ये एकाने ड्रोन उडवल्याची घटना समोर आली. एका स्थानिकाने हा ड्रोन उडताना पाहिला, त्यामुळे त्याने तत्काळ ही घटना पोलिसांच्या निदर्शनास आणून दिली.

- Advertisement -

हेही वाचा – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देहू दौऱ्यातील खास क्षणचित्रे

दरम्यान, ही सूचना प्राप्त होताच, गावदेवी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांनी याप्रकरणी चौकशी करायला सुरुवात केली. ड्रोनच्या वापरामागे कोणाचा हात आहे हे तपासताना मुंबईतील एका प्रमुख बिल्डरचं नाव समोर आलं. त्याच्या भूखंडच्या मानचित्रण आणि जाहिरातीसाठी ड्रोनचा वापर करण्यात आल्याचे समोर आले. दरम्यान, या बिल्डरने ड्रोन वापरासाठी परवानगीही घेतली होती. मात्र, ड्रोन उडवताना त्याने काही नियमांचं उल्लंघन केलं होतं.

हेही वाचा – पालखी मार्गांसाठी ११ हजार कोटींचा निधी, नरेंद्र मोदींचे वारकऱ्यांना आश्वासन

ड्रोनविषयी माहिती मिळताच खळबळ माजली. सुरक्षेसाठी पोलिसांनी या ड्रोनवर बंदूकही रोखली होती. पोलिसांनी दिलेल्या आदेशांचं उल्लंघन केल्याप्रकरणी बिल्डरविरोधात भारतीय दंड संहिता (आयपीएस) १८८ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Sneha Kolte
Sneha Koltehttps://www.mymahanagar.com/author/skolte/
6 वर्षांचा माध्यम क्षेत्रात अनुभव. राजकारण, मनोरंजन विषयात लिखाणाची आवड.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -