Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र "तुम्हीच आमचे नेते आणि आमची कमिटी...", छगन भुजबळांचे शरद पवारांना आवाहन

“तुम्हीच आमचे नेते आणि आमची कमिटी…”, छगन भुजबळांचे शरद पवारांना आवाहन

Subscribe

मुंबई | “तुम्हीच आमचे नेते आणि तुम्हीच आमची कमिटी तुम्हीच सगळे काय”, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी शरद पवार ( Sharad Prabha) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्ष पदावरून पायउतार होण्याचा निर्णय मागे घेण्यासाठी आवाहन केले. आज ‘लोक माझे सांगाती’ या शरद पवार यांच्या राजकीय आत्मकथेच्या सुधारित आवृत्तीच्या प्रकाशना कार्यक्रमादरम्यान त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP President) अध्यक्ष पदावरून निवृत्ती घेण्याची घोषणा केली. यावेळी या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेत्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यत सर्वांनी शरद पवार यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न केले आहे.

यावेळी छगन भुजबळ म्हणाले, “तुम्ही तुमचे वय नाही हे आम्हाला सांगू नका. कारण ते आम्हाला अमान्य आहे. या वयातही तुम्ही कोणाहीपेक्षा तुम्ही दहापट काम करता. आज या पक्ष, राज्य आणि देशाला सुद्धा तुमच्या नेतृत्वाची गरज आहे. अशावेळा तुम्ही निवृत्तीचा निर्णय घेणे हे आम्हालाच काय देशातील कोणत्याही व्यक्तीला ते मान्य होणार नाही. यामुळे आम्ही तुम्हाला सगळ्यांच्या वतीने विनंती करतो की, आपण निवृत्तीचा निर्णय तातडीने मागे घ्यावा. आम्ही सगळेच तुमच्या म्हणण्याप्रमाणे वागलो आहोत. तुमच्यासोबत सुखात, दु:खात आम्ही चाललो आहोत. तुम्ही आमच्या सोबत राहिला आहात, अशावेळी आम्ही तुम्हीला बाजूला ठेवू कसे काम करणार?  कमिटी वैगेर आम्हाला काही मंजूर नाही. आम्हाला ते काहीही नको. तुम्ही आमचे नेते, तुम्हीच आमचे नेते आणि तुम्हीच आमची कमिटी तुम्हीच सगळे काय”, असे म्हणत शरद पवारांचे राजीनाम्यापासून मन वळविण्यासाठी प्रयत्न करत होते.

- Advertisement -

सर्वात क्लेशदायक दिवस – सुनील तटकरे

“पुरोगामी विचारांच्या सर्व कार्यकर्त्यांच्या आयुष्यातील सर्वात क्लेशदायक दिवस आहे. कोणालाही अपेक्षा नव्हती की, आपण या कार्यक्रमातदरम्यान हा निर्णय जाहीर कराल. या निर्णयामुळे आम्हा सर्वांच मोठा धक्का बसलेला आहे, अशी भावना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी शरद पवारांच्या पक्षाच्या अध्यक्ष पदावरून निवृत्ती होण्याच्या निर्णयासंदर्भात बोलताना म्हणाले.

- Advertisement -

सुनील तटकरे पुढे म्हणाले, “सर्वांचे जीवन राजकीय, व्यक्तिगत, सामाजिक जीवन हे आपल्या विना व्यर्थ आहे. देशाची आणि राज्याची गरज जर आपण लक्ष्यात घेतली. विशेष करून सर्व क्षेत्रातील प्रत्येकांची गरज आपण लक्ष्यात घेतली. आपण १ मे १९६० साली जबाबादरी घेतली. २ मे २०२३ हा दिवस आपण आम्हला अप्रिय निर्णयाची घोषणा करण्यासाठी हा दिवस का? निवडला मला माहीत नाही.”

 

- Advertisment -