घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रकुंभमेळयात पर्यटकांसाठी बजेट हॉटेल्स उभारा : छगन भुजबळ

कुंभमेळयात पर्यटकांसाठी बजेट हॉटेल्स उभारा : छगन भुजबळ

Subscribe

नाशिक : भारत सरकारचा उपक्रम असलेल्या आयआरसीटीसीच्या मागणीप्रमाणे नाशिकमध्ये पर्यटन वाढीसाठी तसेच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘बजेट हॉटेलसाठी’ नाशिकमध्ये जमीन उपलब्ध करुन देण्यात यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. छगन भुजबळ यांनी याबाबत नाशिकचे जिल्हाधिकारी आणि राज्याचे मुख्य सचिव यांना पत्र दिले आहे.

इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कोर्पोरेशन लि. (आयआरसीटीसी) ही भारतीय रेल्वेची एक विस्तारित शाखा आहे. भारत सरकारचा उपक्रम असलेली आयआरसीटीसी ही संस्था केटरिंग आणि हॉस्पिटॅलिटी सेवांद्वारे श्रेणी सुधारित करणे, व्यावसायिक बनवणे आणि व्यवस्थापित करणे, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय पर्यटनाला चालना देणे आणि बजेट हॉटेल्स, विशेष टूर पॅकेजेस यांचा विकास करण्यासाठी काम करते. हा उपक्रम रेल्वे पर्यटन पोर्टलद्वारे आणि बजेट हॉटेल्स, लक्झरी ट्रेन्स चालवून पर्यटनाला चालना देत आहे. उदा. महाराजा एक्सप्रेस, बुद्धीस्ट सर्किट ट्रेन्स इ. आयआरसीटीसीची नवी दिल्ली, रांची, पुरी आणि कोलकाता येथे बजेट हॉटेल्स आहेत. सध्या लखनौ, खजुराहो आणि केवडिया (गुजरात) येथे हॉटेलचे बांधकाम सुरु असल्याचे निदर्शनास आणून दिले आहे.

- Advertisement -

नाशिकमध्ये आयआरसीटीसीकडून बजेट 3 स्टार आणि 4 स्टार हॉटेलच्या विकासासाठी 100-125 खोल्यांसाठी योग्य जमीन उपलब्ध करण्याचे प्रयत्न आहे. संचालक (वित्त) आयआरसीटीसी नवी दिल्ली यांनी मुख्य सचिव महाराष्ट्र शासन यांना 9 डिसेंबर 2022 रोजी नाशिक शहरात बजेट हॉटेलसाठी जागा उपलब्ध करुन देण्याची पत्राद्वारे विनंती केली आहे. नाशिकचे पर्यटनाच्या दृष्टीने असलेले महत्व तसेच आगामी कुंभमेळा लक्षात घेता, आयआरसीटीसीला नाशिकमध्ये बजेट हॉटेल्स तयार करण्यासाठी जागा उपलब्ध करुन देण्याची आवश्यकता आहे. या माध्यमातून नाशिकच्या पर्यटनाला अधिक चालना मिळणार असून नाशिकची पर्यटन क्षमता वाढून अर्थकारणाला देखील अधिक गती मिळणार असल्याचे म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -