घरताज्या घडामोडीशिक्षणमंत्र्यांनी 'ते' विधान केलं नसतं तर कदाचित.., शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांवार घणाघात

शिक्षणमंत्र्यांनी ‘ते’ विधान केलं नसतं तर कदाचित.., शरद पवारांचा चंद्रकांत पाटलांवार घणाघात

Subscribe

भाजप नेते आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याबाबत केलेल्या विधानावरुन विरोधी पक्ष चांगलेच आक्रमक झाले आहेत. चंद्रकांत पाटील यांच्यावर पिंपरी-चिंचवड येथे समता सैनिक दलाच्या एका कार्यकर्त्याने शाई फेकली होती. या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली होती. दरम्यान या प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत चंद्रकांत पाटील यांच्यावर घणाघात केला आहे.

वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात शरद पवार म्हणाले की, जो काही प्रकार घडला त्याचं समर्थन मी करणार नाही. हे योग्य नाही. विरोधकांवर टीका करण्याचा अधिकार त्यांचा जसा आहेत. तसेच आपलाही अधिकार सत्ताधाऱ्यांवर टीका करण्याचा आहे. परंतु कुणाच्या अंगावर शाई फेकणं याचा अर्थ टीका करणं असा होत नाही. त्याचं समर्थन आपण कधीही करणार नाही. परंतु शिक्षण मंत्र्यांनी जे विधान केलं ते केलं नसतं तर कदाचित हा प्रकार घडला नसता, असं शरद पवार म्हणाले.

- Advertisement -

चंद्रकात पाटलांनी फुलेंचा उल्लेख केला. आंबेडकर, भाऊराव पाटील यांचाही उल्लेख केला. तसेच भीक हा शब्दही वापरला. हा शब्द कुणालाही आवडणार नाही. फुलेंचं आणि आंबेडकरांचं संपूर्ण जीवन देशाला माहिती आहे. कर्मवीरांनी आपलं जीवन ज्ञानदानासाठी घालवलं. कमवा आणि शिका असं कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या संस्थेचं ब्रिद आहे. या संस्थेचा मी गेल्या ५० वर्षांपासून अध्यक्ष आहे. तिथे आम्ही कधीही राजकारण आणत नाही, असंही शरद पवार म्हणाले.

मी महाराष्ट्रातील सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या सर्वपक्षीय मित्रांना आवाहन करतो की, शाई टाकणं, तत्सम कृत्य करणं, असले प्रकार आपण करणार नाही, अशी भूमिका आपण घेऊन. तसेच सुसंस्कृत महाराष्ट्राचा लौकिक टिकवण्याची खबरदारी घेऊ, असं आवाहन पवार यांनी केलं.

- Advertisement -

हेही वाचा : राज्यपालांनी शाहांना लिहिलेलं पत्र आज कसं काय बाहेर आलं?, अमोल कोल्हेंचा


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -