Monday, June 5, 2023
27 C
Mumbai
घर महाराष्ट्र शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्यापासून वाचली

शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाविकास आघाडीत बिघाडी होण्यापासून वाचली

Subscribe

मुंबई : काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress Leader Rahul Gandhi)  गेल्या काही दिवसांपासून वीर सावरकरांवर टीका करत आहेत. परंतु हे प्रकरण आता वाढल्यामुळे महाविकास आघाडीत बिघाडीत होत असल्याची चर्चा सुरू झाली होती. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी आपली नाराजी काँग्रेस नेतृत्वापर्यंत पोहोचवत एकत्र राहायचे असल्याचे सावरकरांवर वक्तव्य बंद करा, असा इशारा दिला होता. त्यामुळे महाविकास आघाडीत तणाव वाढत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) धावून आले आहेत.

हेही वाचा – धक्कादायक घटना! मंत्रालयासमोर विषप्राशन केलेल्या महिलेचा मृत्यू

- Advertisement -

काँग्रेस नेते राहुल गांधी वीर सावरकरांवर वारंवार टीका करत आहेत आणि काँग्रेस पक्ष त्यांच्या बाजूने खंबीरपणे उभे आहे. त्यामुळे काँग्रेस आणि शिवसेना यांच्यात वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी सोमवारी (२७ मार्च) विरोधी पक्षनेत्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीत शरद पवार म्हणाले की, वीर सावरकरांना वारंवार लक्ष्य केल्याने महाविकास आघाडीला सत्तेवर येण्यासाठी कोणतीच मदत होणार नाही. या बैठकीला शिवसेना सोडल्यास (उद्धव बाळासाहेब ठाकरे), काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षांचे नेतेही उपस्थित होते.

हेही वाचा – राज्यात महागाईचा झटका, ‘सरकार गतिमान, महागाई वेगवान’; राष्ट्रवादीचा सरकारला टोला

- Advertisement -

शरद पवार म्हणाले की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सावरकर यांच्या भूमिका वेगळ्या असल्यामुळे त्यांना माफीवीर म्हणणे योग्य नाही, अशी ठाम भूमिका शरद पवार यांनी बैठकीत मांडली. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकाअर्जून खर्गे यांनी पवारांच्या मताला दुजोरा दिला. त्यामुळे काँग्रेसने एक पाऊल मागे येत सावरकरांबाबत आपली भूमिका मवाळ करण्यास सहमती दर्शविल्यामुळे शरद पवार यांनी महाविकास आघाडी फुटण्यापासून वाचवली आहे. शरद पवार यांच्या भूमिकेचा मी सन्मान करतो असे, राहुल गांधी म्हणाले. सावरकरांवर टीका केल्याने कोणाच्या भावना दुखवणार असतील तर आपण या मुद्द्यांवर टीका करणार नाही, असे राहुल गांधी यांनी सांगितले.

 

- Advertisment -