युवक प्रतिष्ठान हा ब्लॅक मनी वाईट करण्याचा उद्योग; संजय राऊतांचा सोमय्यांवर हल्लाबोल

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी किरीट सोमय्यांच्या नव्या घोटाळ्याची माहिती दिली आहे. संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास एक ट्विट केलं आहे. यामध्ये संजय राऊत यांनी नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड म्हणजेच एनसएसईएलसंदर्भातील ५६०० कोटींच्या घोटाळ्यामध्ये सोमय्यांनी लाखो रुपये आपल्या युवक प्रतिष्ठानसाठी घेतल्याचा आरोप केला आहे.

sanjay raut slams modi government Seeing the atmosphere in the country British rule was good
देशातील वातावरण पाहून इंग्रजांची राजवट बरी होती, संजय रांऊतांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी किरीट सोमय्यांच्या नव्या घोटाळ्याची माहिती दिली आहे. संजय राऊत यांनी बुधवारी सकाळी 8 वाजताच्या सुमारास एक ट्विट केलं आहे. यामध्ये संजय राऊत यांनी नॅशनल स्पॉट एक्सचेंज लिमिटेड म्हणजेच एनसएसईएलसंदर्भातील ५६०० कोटींच्या घोटाळ्यामध्ये सोमय्यांनी लाखो रुपये आपल्या युवक प्रतिष्ठानसाठी घेतल्याचा आरोप केला आहे. त्यानंतर राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना किरीट सोमय्यांचे युवक प्रतिष्ठान म्हणजे ब्लॅक मनी वाईट करण्याचा उद्योग असल्याचे म्हटलं. तसंच, फक्त एकट्या किरीट सोमय्याचे नाही, भारतीय जनता पक्षाच्या 28 प्रमुख नेत्यांची प्रकरणं उघडी पाडणार असल्याचेही यावेळी संजय राऊत यांनी सांगितलं.

“हे जे महाशय आहेत किरीट सोमय्या जे स्वत:ला भ्रष्टाचारविरोधी लढ्याचे प्रमुख आधारस्तंभ मानतात. त्यांचा खरा चेहरा काय आहे?, मी आज सुद्धा एक प्रकरण बाहेर काढलं आहे. हे मोतीलाल ओसवालाल कंपनी जी शेअर बाजार, गुंतवणूक, स्टॉक ब्रोकिंग यासाठी काम करणारी मोठी कंपनी आहे. जो घोटाळा झाला होता ५६०० कोटींचा शेअर घोटाळा NSCL. त्याच्या त्या कंपनीचे नाव आलं. मोतीलाल ओसवालाल कंपीनीची चौकशी व्हावी यासाठी सोमय्यांनी आकांड तांडव केलं. पोलिसांकडे मागणी केली. स्वत: त्यांच्या कार्यालयात गेले. चौकशीसाठी त्यांच्या शिपायांच्या घरी गेले. मात्र त्यानंतर किरीट सोमय्यांच्या युवक प्रतिष्ठानला मोतीलाल ओसवालालकडून मोठ्या-मोठ्या म्हणजेच लाखोंच्या देणग्या मिळालेल्या आहेत.”

“मी फक्त सध्या लहान लहान प्रकरण समोर आणतोय. सध्या हे दोन चेक मला निदर्शनास आलेले आहेत. मग तुम्ही भ्रष्टाचाराविरोधात कुठला लढा लढत आहात?, असा सवाल राऊत यांनी उपस्थित केला. त्यानंतर या घोटाळ्यात तुमचा संबंध आहे असं आम्ही म्हटलं, तर यावर तुमचं काय मत आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून मी नवीन नवीन प्रकरण समोर आणतोय. त्यावर त्यांचा अद्याप खुलासा आलेला नाही. युवक प्रतिष्ठान हा ब्लॅक मनी वाईट करण्याचा उद्योग आहे. मुंबईतले बिल्डर्स, उद्योगपती, व्यापारी तसंच, विशेषता ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयच्या कारवाया सुरू आहेत, अशा लोकांना ब्लॅकमेल करून किरीट सोमय्या लाखो-कोट्यावधी रुपयो गोळा करतात, युवक प्रतिष्ठानच्या नावावर चेक गोळा करतात. या सगळ्याची आता चौकशी सुरी होणार आहे. धर्मादाय आयुक्त, चॅरिटी कमिशनर आणि आर्थिक गुन्हे विभाग त्यानंतर याबाबतची सगळी माहिती आम्ही ईडीला सुद्धा देणार आहोत. कारण यामध्ये ईडीचा थेट संबंध आहे.”

“ईडीने कारवाई केलेल्या कंपन्यांनकडून याने पैसे घेतले, लीस्ट काय आहेत त्या गुन्हेगारीच्या, जसं ते विचारतात ना. ‘किरीट सोमय्यांचा नेहमी प्रश्न असतो, क्या संबंध है आपका? कहा से आया पैसा?’, प्रोसीड ऑफ क्राईमचे पैसे तुमच्या युवा प्रतिष्ठानच्या खात्यामध्ये कसे जमा झाले? असे सवाल उपस्थित करत हा तपास यंत्रणांच्या चौकशीचा प्रश्न असल्याचे संजय राऊत यांनी म्हटलं. हे सगळे पैसे भ्रष्ट मार्गाने आलेले असून, ही एक प्रकारची खंडणी असल्याचा आरोपही यावेळी संजय राऊतांनी केला.”

“किरीट सोमय्यांचा खरा चेहरा यामध्ये समोर आला आहे. भ्रष्टाचारी लोक सांगतात महाराष्ट्र भ्रष्टाचार मुक्त करणार, यांच्या स्वत:च्या तोंडाला शेणाचा वास आहे आणि हे दुसऱ्याच्या तोंडाचा वास घ्यायला जाताहेत. यांचा खेळ संपलेला आहे. रोज ही प्रकरण समोर येतील. सुरूवाती मागील काही काळापूर्वी तुम्ही केली आणि आता या प्रकरणाचा शेवट आम्ही करणार असल्याचे संजय राऊत यांनी सांगितलं. तसंच, प्रकरण फक्त एकट्या किरीट सोमय्याचे नाही, भारतीय जनता पक्षाच्या 28 प्रमुख नेत्यांचे आहे” असंही संजय राऊत यांनी म्हटलं.


हेही वाचा – NSEL 5600 कोटी घोटाळा, मोतीलाल ओसवाल कडून सोमय्यांनी लाखो रुपये घेतले; संजय राऊतांचा गंभीर आरोप