घरताज्या घडामोडीशहाजीबापूंसारखा नौटंकी माणूस राजकारणात फक्त विनोद करु शकतो, विनायक राऊतांचा हल्लाबोल

शहाजीबापूंसारखा नौटंकी माणूस राजकारणात फक्त विनोद करु शकतो, विनायक राऊतांचा हल्लाबोल

Subscribe

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ऐतिहासिक बंडानंतर आणि काय डोंगार, काय झाडी, काय हाटील या डायलॉगमुळे रातोरात प्रसिद्धीच्या झोतात आलेले आमदार शहाजीबापू पाटील यांच्यावर शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी निशाणा साधला आहे. शहाजीबापू यांच्यासारखा नौटंकी करणारा माणूस राजकारणात फक्त विनोद करु शकतो. पण एखाद्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करु शकत नाही, असा हल्लाबोल विनायक राऊत यांनी केला आहे.

विनायक राऊत यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी ते म्हणाले की, शहाजीबापूंसारखा नौटंकी माणूस राजकारणात फक्त विनोद करु शकतो. ते एखाद्या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करू शकत नाहीत. ही बाब सांगोला मतदार संघातील जनतेच्या लक्षात आल्यामुळे तिथली लहान मुलं, विद्यार्थीही, शहाजीबापू इज नॉट ओक्के, शिवसेनाच ओक्के, असे विनायक राऊत म्हणाले.

- Advertisement -

मागील काही दिवसांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे सातत्याने शिंदे गटातील आमदारांवर आगपाखड करत आहेत. हे सर्वजण गद्दार आहेत, हे ठसवण्याचा प्रयत्न उद्धव ठाकरे गटाकडून गेला जात आहे. शहाजीबापू यांनाही सांगोल्यात शह देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी नुकताच एक मोठा निर्णय घेतला होता. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना पक्षात प्रवेश देत उद्धव ठाकरे यांनी सांगोल्यातच शहाजीबापू पाटील यांच्यासमोर आव्हान उभे केले आहे.


हेही वाचा : …तह केला असता तर शिवसेना फुटली नसती, गुलाबराव पाटलांची टीका

- Advertisement -

 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -