घरताज्या घडामोडीSanjay Raut Press conference : शिवसेनेचा 'लावरे तो व्हिडिओ पॅटर्न', कोणता व्हिडिओ...

Sanjay Raut Press conference : शिवसेनेचा ‘लावरे तो व्हिडिओ पॅटर्न’, कोणता व्हिडिओ बॉम्ब फोडणार ?

Subscribe

संजय राऊत यांनी निकटवर्तीयाला १०० कोटी रूपयांचे पुणे जंबो कोविड सेंटरचे कंत्राट मिळवून दिल्याचा आरोप भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. त्याबाबतची तक्रारही आझाद मैदान पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. या सगळ्या प्रकारावर प्रसार माध्यमांशी बोलताना संजय राऊत म्हणाले की,  खूप विचित्र पद्धतीचे राजकारण सुरू झाले आहे. आम्ही खूप सहन केले, पण आता बर्बाद करणार असल्याचा दावा शिवसेनेचे प्रवक्ते आणि खासदार संजय राऊत यांनी सोमवारी केला होता. शिवसेनेचे आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत शिवसेना शक्ती प्रदर्शन करणार असल्याचेही ते म्हणाले. भाजपचे साडेतीन लोक येत्या काही महिन्यांमध्ये अनिल देशमुख यांच्या कोठडीत असतील आणि अनिल देशमुख बाहेर असतील असा दावा संजय राऊत यांनी सोमवारी केला होता. आज दुपारी चार वाजता शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेऊन मोठा गौप्यस्फोट करणार असल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. या पत्रकार परिषदेसाठी शिवसेनेकडून मनसे पॅटर्न फॉलो करण्यात येणार असल्याचे कळते. पत्रकार परिषदेत लावरे तो व्हिडिओ पॅटर्न दिसणार आहे. त्यासाठीच शिवसेनेकडूनही जय्यत तयारी सुरू झाल्याचे चित्र शिवसेना भवन दिसत आहे.

नाशिकहून शिवसैनिक मुंबईकडे

संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेच्या निमित्ताने मोठे शक्ती प्रदर्शन होणार आहे. त्यासाठी नाशिकहून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते हे रस्ते मार्गाने मुंबईकडे निघाले आहे. मुंबईत आमदार आणि खासदारांसोबतच कार्यकर्तेही मोठ्या प्रमाणात दाखल होत असल्याची माहिती आहे.

- Advertisement -

पोलीस बंदोबस्तात वाढ

शिवसेना भवन येथे कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहता पोलीस बंदोबस्तही मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आला आहे. मोठ्या संख्येने शिवसैनिक याठिकाणी हजर राहणार असल्याने पोलीसांची संख्या वाढवली आहे. याठिकाणी एलईडी स्क्रीनही लावण्यात आले आहे.

लावरे तो व्हिडिओ

पत्रकार परिषदेत लावरे तो व्हिडिओ ची तयारी केली आहे. संजय राऊतांकडून नेमके कोणते व्हिडिओ लावून या पत्रकार परिषदेत व्हिडिओ बॉम्ब लावणार हे पाहण्यासारखे असणार आहे.

- Advertisement -

 

Kiran Karande
Kiran Karandehttps://www.mymahanagar.com/author/kiran/
१२ वर्षांपासूनचा प्रिंट, डिजिटल असा प्रसारमाध्यम क्षेत्रातील अनुभव. वाहतूक, शिक्षण, नागरी सुविधा, ऊर्जा, हवामान विषयावर लिखाण.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -