विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी शिवसेनेकडून अंबादास दानवे यांची शिफारस

औरंगाबादचा विरोधी पक्षनेता झाल्यास मराठवाड्यात शिवसेनेला बळकटी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

ambadas danave

राज्याच्या विधान परिषदेतील विरोधी पक्षनेतेपदी कोणाची नियुक्ती होणार याकडे लक्ष लागलेलं असतानाच शिवसेनेने राजकीय खेळी खेळली आहे. या पदासाठी अंबादास दानवे यांची नियुक्ती करावी अशी शिफारस शिवसेनेने केली आहे. याबाबत उद्धव ठाकरेंच्या सहीने सभापतींना पत्रही पाठवण्यात आले आहे. (ShivSena recommends Ambadas Danve for the post of Leader of Opposition in Legislative Council)

हेही वाचा मोठी बातमी! आशिष शेलार भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष होणार?, चंद्रकांतदादा कॅबिनेटमध्ये

महाविकास आघाडीत शिवसेनेकडे विधान परिषदेचे सर्वाधिक १३ आमदार आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून विरोधी पक्षनेतेपदावर दावा सांगण्यात आला. अंबादास दानवे हे मराठवाड्यातील शिवसेनेचे आक्रमक नेतृत्त्व आहेत. औरंगाबाद जिल्ह्यातून ६ आमदारांनी बंडखोरी केल्यानंतरही अंबादास दानवे यांनी ठाकरेंची साथ सोडली नाही. तसेच, औंरगाबाद हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. बंडखोरी झाल्यामुळे शिवसेनेला आता पुन्हा नव्याने उभं राहावं लागणार आहे. त्याकरता शिवसेनेने अंबादास दानवे हा चेहरा नव्याने लॉन्च करायचं ठरवलं. औरंगाबादचा विरोधी पक्षनेता झाल्यास मराठवाड्यात शिवसेनेला बळकटी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे अंबादास दानवे यांच्या नावाची शिफारस करण्यात आली आहे.

हेही वाचा – नव्या मंत्र्यांसाठी पावसाळी अधिवेशन पुन्हा पुढे ढकलण्याची शक्यता, नवी तारीख कोणती?

दरम्यान, विधान परिषदेमधील विरोधी पक्षनेतेपदासाठी सचिन अहिर, मनिषा कायंदे हे दोन्ही आमदार इच्छुक होते. मात्र, ठाकरे या दोघांनाही बाजूला सारून अंबादास दानवे यांना संधी दिली आहे. अंबादास दानवे हे आक्रमक असून सरकारला अडचणीत आणण्याची ताकद त्यांच्या संभाषण कौशल्यात आहे. त्यामुळे बंडखोरी करून सत्ता स्थापन केलेल्या सरकारविरोधात लढण्यासाठीच उद्धव ठाकरे यांनी अंबादास दानवे यांची शिफारस केली असल्याचं म्हटलं जात आहे.

हेही  वाचा – टीईटी घोटाळ्यात सत्तारांचा संबंध असल्यास चौकशी झाली पाहिजे, अंबादास दानवेंची मागणी

शिफारस पत्रात काय म्हटलं आहे?

शिवसेना विधिमंडळ पक्षाच्या दि. ९ जुलै २०२२ रोजी झालेल्या विधान परिषद सदस्यांच्या बैठकीत विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते पदावर नियुक्त करावयाच्या सदस्याचे नाव ठरविण्याचा अधिकार शिवसेना पक्षप्रमुख म्हणून मला अर्थात उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना देण्यात आला. त्यानुसार मी महाराष्ट्र विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदावर अंबादास एकनाथराव दानवे यांची नियुक्ती करावी, अशी शिफारस करत आहे.

हेही वाचा – मोठी बातमी! जनतेतून निवडून आलेल्यांनाच शिंदे- फडणवीस कॅबिनेटमध्ये संधी?