घरमहाराष्ट्रछत्रपती संभाजीनगर...म्हणून पुरावे असूनही 40 वर्षांपासून आरक्षण मिळत नव्हतं; मनोज जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर...

…म्हणून पुरावे असूनही 40 वर्षांपासून आरक्षण मिळत नव्हतं; मनोज जरांगेंचा ओबीसी नेत्यांवर आरोप

Subscribe

छत्रपती संभाजीनगर : मराठा आंदोलक मनोज जरांगे रोज पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणावर भाष्य करत आहेत. आज ओबीसी नेत्यांवर आरोप करताना म्हटले की, मराठ्यांना आरक्षण मिळू नये हे ओबीसी नेत्यांच्या मनात आहे. त्यांचा सरकारवर दबाव होता, म्हणून पुरावे असूनही आम्हाला आरक्षण मिळत नव्हतं, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे. (Reservation was not available for 40 years despite evidence of OBC leaders pressuring the government Manoj Jarangs allegation)

हेही वाचा – …तर ओबीसी आरक्षणविरोधी नेत्यांची नाव जाहीर करणार; मनोज जरांगेंचा पुन्हा इशारा

- Advertisement -

मनोज जरांगे म्हणाले की, आमच्याकडे पुरावे नाहीत, म्हणून आम्ही ओबीसीत गेलो तर असं नाही आहे. आमच्याकडे पुरावे आहेत म्हणून आम्हाला कुणबी प्रमाणपत्र मिळत आहे. आमच्याकडे पुरावे नसते, तर गाव पातळीवर ओबीसींनी विरोध केला असता, असं मनोज जरांगे यांनी स्पष्ट केलं. तसेच ग्रामीण भागातील ओबीसी बांधव त्यांच्याच नेत्याला नावं ठेवत आहेत. तुम्ही मराठा समाजाला विरोध करुन मराठा आणि ओबीसीमध्ये भांडण लावण्याचा काम करत आहात, असेही मनोज जरांने यांनी सांगितले.

ओबीसी नेत्यांचा सरकारवर दबाव

ओबीसी समाजाचे मोर्चे निघणार आहेत, ही चांगली गोष्ट आहे, परंतु ओबीसी बांधवांनी एक गोष्ट समजून घ्यावी, आमच्याकडे पुरावे आहेत, असे मनोज जरांगे म्हणाले. त्यांनी सांगितले की, ग्रामीण भागात एखाद्याची जमीन असेल, त्याचा रेकॉर्ड असेल, तर आरक्षण मिळालं पाहिजे. पण आमचं असूनही देऊ नका म्हणत असाल, तर मग गोरगरीब, मराठ्यांच्या लेकरावर का कोपताय? असा प्रश्न उपस्थित करत मराठ्यांना आरक्षण मिळू नये हे ओबीसी नेत्यांच्या मनात आहे. मागच्या 30-40 वर्षांपासून ओबीसी नेत्यांचा सरकारवर दबाव होता. म्हणून पुरावे असूनही आरक्षण मिळत नव्हत, असा आरोप मनोज जरांगे यांनी केला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – “बेकायदेशीर सरकारवर बुलडोजर फिरवण्याची आवश्यकता…”, मुंब्य्रातील घटनेने संजय राऊत संतापले

…अन्यथा आरक्षणविरोधी नेत्यांची नाव जाहीर करणार

दरम्यान, बोलताना मनोज जरांगे असेही म्हणाले की, आमच्याकडे पुरावे आहेत म्हणून आम्हाला कुणबी दाखले मिळत आहेत. पण तरीही ओबीसी नेते विरोध करत आहेत. परंतु आम्हाला हक्काचं आरक्षण मिळायलाच हवं. पुरावे असून 40 वर्ष मराठ्यांचे वाटोळं झालं. पण आता आमचं आरक्षण आम्हाला मिळतं आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागलेला नाही. ज्यांनी आमच्या नोकऱ्या हडपल्या त्यांना काढून टाकायला हवं. सामान्य मराठ्यांचे वाटोळं करुन मराठा नेते मंत्री झाले. त्यामुळे आता आमच्या नोकऱ्या आम्हाला मिळायला हव्यात. नाहीतर कुणी ओबीसी आरक्षण रोखलं त्याची यादी समोर आणणार. 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण द्या अन्यथा आरक्षणविरोधी नेत्यांची नाव जाहीर करणार, अशा इशारा मनोज जरांगे यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -