somaiya kolhapur tour : सोमय्यांचा कोल्हापूर दौरा आता नॉनस्टॉप; जिल्हाधिकाऱ्यांनी हटवले प्रतिबंध

आता पुन्हा कोल्हापूरमध्ये येण्यापासून आघाडी सरकारने मला थांबवून दाखवावे - किरीट सोमय्या

somaiya kolhapur tour Somaiya's Kolhapur Collector removed Restrictions over somaiyas tour
somaiya kolhapur tour : सोमय्यांचा कोल्हापूर दौरा आता नॉनस्टॉप; जिल्हाधिकाऱ्यांनी हटवले प्रतिबंध

भाजप माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या कोल्हापूर दौऱ्यावरील निर्बंध कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी हटवले आहेत. यामुळे आता सोमय्यांच्या दौऱ्यातला अडथळा दूर झाला आहे. राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्याविरोधातील घोटाळ्याचा आरोप सोमय्या यांनी केला आहे. तसेच कोल्हापूरमधील कारखान्याची पाहणी करुन पोलिसांत मुश्रीफांविरोधात तक्रार सोमय्या तक्रार करणार आहेत. सोमय्यांच्या दौऱ्यावर कार्यकर्ते संतप्त झाले असल्यामुळे दौऱ्यादरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल यामुळे कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी निर्बंध लागू केले होते. परंतु अखेर कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यावरील निर्बंध हटवले आहेत.

कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या दौऱ्यावरील प्रतिबंध हटवले आहेत. यामुळे सोमय्या यांचा कोल्हापूर दौरा आता नॉनस्टॉप होणार आहे. कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी निवेदन जारी करत याची घोषणा केली आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे की, २८ सप्टेंबर रोजी किरीट सोमय्या यांचा नियोजित कोल्हापूर दौऱ्यादरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारे सार्वजनिक शांतता व कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही अशी माझी खात्री झाली आहे. त्यामुळे सोमय्या यांना कोल्हापूर जिल्हा प्रवेश बंदी बाबतचा पारित केलेला आदेश विखंडित करण्यात येत आहे. असे जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केलं आहे.

मला थांबवून दाखवा – सोमय्या

किरीट सोमय्या मंगळवारी कोल्हापूर दौरा करणार आहेत. मागील दौऱ्यादरम्यान कोल्हापूर जिल्ह्यात सोमय्यांना येण्यास निर्बंध लावले होते. सोमय्या कोल्हापूरमध्ये आल्यास कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित केला होते. तसेच सोमय्यांना कोल्हापूरमध्ये येण्यास प्रतिबंध लादले होते. तर आता पुन्हा कोल्हापूरमध्ये येण्यापासून आघाडी सरकारने मला थांबवून दाखवावे असा इशारा माजी खासदार किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारला दिला आहे.

सोमय्यांच्या दौऱ्यात अडचण आणू नका

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी माध्यमांशी संवाद साधला आहे. यावेळी मुश्रीफ यांनी म्हटलं आहे की, माजी खासदार किरीट सोमय्यांना माझी सूचना आहे. कोल्हापूर जिल्हा शांतताप्रिय आहे. याची शांतता बिघडू नये आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू नये अशा प्रकारचे विधाने करावी अनेकवेळा त्यांनी वक्तव्य केलं आहे. पुन्हा त्यांनी पुर्वीसारखे वक्तव्य केलं तर शांतता आणि कायदा व सुव्यवस्था बिघडू शकते त्यामुळे त्यांनीही दौरा शांततेत करावा. सूचना केली होती की, कोल्हापूरमधील राजकीय, सामाजिक आणि सहकारी क्षेत्रातील माझ्या कामाबाबत माहिती घ्यावी अशी विनंती असल्याचे हसन मुश्रीफ यांनी म्हटलं आहे.


हेही वाचा : ईडी हे भाजपचं उपकार्यालय; अडसूळ यांच्यावरील कारवाईनंतर अरविंद सावंत यांचा हल्लाबोल