घरमहाराष्ट्रWeather Update : कोल्हापूरसह 'या' भागात अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं

Weather Update : कोल्हापूरसह ‘या’ भागात अवकाळी पाऊस; शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं

Subscribe

मुंबई : नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात राज्यात थंडीची चाहूल लागली. बहुतांश भागांमध्ये किमान तापमानाच घटही नोंदवण्यात आली. पण, या महिन्याचा दुसरा आठवडा ओलांडला आणि राज्यातील किमान तापमानासह कमाल तापमानही वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळे पहाटेपासून थंडी तर दुपारच्या सुमारास नागरिकांना उकाडा जाणवत आहे. अशातच, राज्यासह देशातील काही भागांमध्ये हवामान खात्याने पावसाचा अंदाज वर्तवला आहे. (Weather Update  Unseasonal rain in Kolhapur sangli Solapur The tension of the farmers increased)

अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यामुळे गेल्या 3-4 दिवसांपासून राज्यात ढगाळ वातावरण दिसत आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात 9 नोव्हेंबरपर्यंत हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

- Advertisement -

हेही वाचा – राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची दिवाळी होणार गोड! शिंदे सरकार महागाई भत्त्यात करणार ‘इतकी’ वाढ

दोन दिवसांपूर्वीच हवामान खात्याकडून कोल्हापूर, सिंधुदुर्गासह सातारा आणि सांगली या पट्ट्यामुळे विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार मंगळापासून कोल्हापूर जिल्ह्यात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर आज पहाटेपासूनच शहर आणि परिसरात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. याशिवाय सोलापूर जिल्ह्यासह मंगळवेढा तालुक्यात पावसाळा सुरुवात झाली आहे. काल रात्रीपासून जिल्ह्यातील काही भागात विजेच्या कडकडासह पाऊस पडत आहे.

- Advertisement -

सांगली जिल्ह्यातही ढगाळ वातावरण असून काही भागात पावसाच्या सरी बरसत आहेत. पलूस भागात पहाटेपासून अवकाळी पाऊस तर जत तालुक्यातील उमदी भागात देखील पावसाला सुरुवात झाली आहे. अवकाळी पाऊसाने द्राक्ष बागांसह अन्य पिकांवर रोगांचा धोका वाढला आहे. याशिवाय सातारा, सांगली, कोल्हापूर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरीत जिल्ह्यात पुढील दोन दिवस हलक्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. मात्र ऐन रब्बी हंगामामध्ये राज्यात पावासाला सुरुवात झाल्यामुळे शेतकऱ्यांचं टेन्शन वाढलं आहे.

हेही वाचा – माळी समाजाचे आहात म्हणून…; प्रकाश आंबेडकरांचा मराठा आरक्षणप्रश्नी भुजबळांवर निशाणा

दक्षिण भारतात मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, पुढील 5 दिवसांत तामिळनाडू, केरळ, कर्नाटक आणि आंध्र प्रदेशमध्ये हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे. दक्षिण तामिळनाडूमध्ये हवेची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे राज्यात पावसाची शक्यता आहे. गोव्यासह तामिळनाडू आणि कर्नाटकमध्येही सध्या जोरदार पाऊस पाहायला मिळत आहे. राज्यात काही ठिकाणी मध्यम ते हलक्या स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे. काही ठिकाणी आकाश निरभ्र तर काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, असेही हवामान खात्याने म्हटले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -