घरमहाराष्ट्रमाळी समाजाचे आहात म्हणून...; प्रकाश आंबेडकरांचा मराठा आरक्षणप्रश्नी भुजबळांवर निशाणा

माळी समाजाचे आहात म्हणून…; प्रकाश आंबेडकरांचा मराठा आरक्षणप्रश्नी भुजबळांवर निशाणा

Subscribe

मुंबई : मराठ आंदोलक मनोज जरांगे यांनी मराठा समाजाला सरसकट ओबीसी जात प्रमाणपत्र देण्याची मागणी केली आहे. मात्र ओबीसी नेत्यांनी या गोष्टीला विरोध दर्शविला आहे. खास करून अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ हे मनोज जरांगेंच्या मागणीला विरोध करताना त्यांच्यावर वारंवरा टीका करताना दिसतात. अशातच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. (As the gardener belongs to the community Prakash Ambedkars Maratha reservation issue targets Chhagan Bhujbal)

हेही वाचा – …तर भुजबळ यांनी सरकारमधून बाहेर पडावे, जातनिहाय जनगणनेसाठी राष्ट्रवादी आग्रही

- Advertisement -

प्रकाश आंबेडकर म्हणाले की, आपण केवळ जातीने माळी आहोत आणि माळी जात ओबीसीमध्ये येत असल्याने आपल्याला ओबीसीवर बोलण्याचा अधिकार आहे, असा अविर्भाव आणू नये. ओबीसींना आरक्षण मिळत असताना तुम्ही होतात कुठे होता? असा सवालही प्रकाश आंबेडकर यांनी उपस्थित केला. तसेच आरक्षणामधील काही कळत नसणाऱ्यांनी बोलू नये, असा टोलाही त्यांनी लगावला. सांगायचे झाले तर, प्रकाश आंबेडकर यांनी मराठा आरक्षणाला यापूर्वीच पाठिंबा दिला आहे. मनोज जरांगे पाटील हे उपोषणाला बसले असताना आंबेडकरांनी त्यांना पत्र लिहत मराठा आरक्षणाला पाठिंबा असल्याचं जाहीर केले होते.

दरम्यान, छगन भुजबळ यांनी सोमवारी (6 नोव्हेंबर) पत्रकार परिषद घेत मराठा आरक्षणाबाबत भाष्य केलं. मराठा समाजाला आरक्षण देण्याला विरोध नाही. पण त्यांना वेगळे आरक्षण द्या. आमच्या आरक्षणामध्ये तुम्ही येऊ नका. कारण जवळजवळ 375 जाती आहेत आणि 54 टक्क्यांपेक्षा जास्त लोक गोरबगरिब आहेत. त्यांच्या आरक्षणावर गदा येईल. त्यामुळे मराठा समाजाल स्वतंत्र आरक्षण द्या. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याला आमचा विरोध आहे. त्यांना मागच्या दाराने ओबीसीमध्ये प्रवेश देण्याचा प्रकार असून यामुळे ओबीसी संपण्याचा धोका आहे, असा आरोपही त्यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – आरक्षणाला धक्का लावणार नाही! देवेंद्र फडणवीसांचा ओबीसी नेत्यांना शब्द

मराठा आरक्षणासंदर्भात भुजबळांच्या वक्तव्यानंतर राजकीय वातावरण तापले

छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षणासंदर्भात भाष्य केल्यानंतर राज्यातील वातावरण तापले आहे. भाजपा आणि शिंदे गटातील मंत्र्यांनी त्यांच्यावर टीका केली आहे. भुजबळ समाजात तेढ निर्माण करत असल्याची त्यांनी म्हटले आहे. याशिवाय मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनीही भुजबळांवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले की, भुजबळांमुळे दोन समाजामध्ये तणाव वाढत आहे. ओबीसी आणि मराठा भाऊ-भाऊ आहेत, त्यामुळे भुजबळांनी तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला मनोज जरांगे यांनी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -