घरताज्या घडामोडीआता व्होटिंग कार्डही आधार कार्डला लिंक करणार, ऑगस्टपासून विशेष मोहीम

आता व्होटिंग कार्डही आधार कार्डला लिंक करणार, ऑगस्टपासून विशेष मोहीम

Subscribe

तसेच मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी ERO Net, GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध असेल. त्याचबरोबर मतदारांकडून छापील नमुना अर्ज क्र 6ब व्दारे आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी निवतकर यांनी सांगितले.

व्होटिंग कार्ड आधार कार्डशी लिंक करण्यासाठी १ ऑगस्टपासून विशेष मोहीम हाती घेण्यात येणार असल्याची माहिती मुंबई शहर जिल्हाधिकारी राजीव निवतकर यांनी दिली. ते म्हणाले की, मतदारांची ओळख प्रस्थापित करून मतदार यादीतील नोंदींचे प्रमाणीकरण करणे आणि एकापेक्षा जास्त मतदार संघात किंवा एकापेक्षा जास्त वेळा त्याच मतदार संघात एकाच व्यक्तीच्या नावाची नोंदणी ओळखली जावी, यासाठी विद्यमान मतदान ओळखपत्राशी आधार कार्ड संलग्न करण्यासाठी 1 ऑगस्ट 2022 पासून विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. (Special campaign for linking voting card and adhar card)

हेही वाचा – आता आधार कार्डवरून मिळणार कर्ज, एसबीआयसह या बँका देत आहेत सुविधा, जाणून घ्या काय आहे योजना?

- Advertisement -

या विशेष मोहिमेत मतदान ओळखपत्रासोबत आधार क्रमांक संलग्न करण्यासाठी नमुना अर्ज क्र. 6ब तयार करण्यात आला आहे. हा अर्ज भारत निवडणूक आयोगाच्या आणि मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला आहे. तसेच मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी ERO Net, GARUDA, NVSP, VHA या माध्यमांवर देखील उपलब्ध असेल. त्याचबरोबर मतदारांकडून छापील नमुना अर्ज क्र 6ब व्दारे आधार क्रमांक गोळा करण्यासाठी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांची नियुक्ती करण्यात येणार आहे, असेही जिल्हाधिकारी निवतकर यांनी सांगितले.

हेही वाचा – PIB Fact Check: पीएम योजनेअंतर्गत आधार कार्डद्वारे दिलं जातंय कर्ज? जाणून घ्या सत्य

- Advertisement -

आधार कार्ड नसेल तर?

मतदाराकडे आधार क्रमांक नसल्यास नमुना क्र. 6ब मध्ये नमूद केल्याप्रमाणे त्यांना मनरेगा जॉब कार्ड, फोटोसहित किसान पासबूक, आरोग्य स्मार्ट कार्ड, वाहन परवाना, पॅनकार्ड, NPR अंतर्गत RGI द्वारा दिले गेलेले स्मार्ट कार्ड, पासपोर्ट, फोटोसहित पेन्शन कागदपत्रे, केंद्र/राज्य शासन कर्मचाऱ्याचे ओळखपत्र, आमदार/खासदार यांना दिलेले ओळखपत्र, सामाजिक न्याय विभागाकडील ओळखपत्र या ११ पर्यायापैंकी कोणताही एक दस्तावेज सादर करता येईल.

मतदान ओळखपत्राशी आधार क्रमांक संलग्न करण्याच्या या विशेष मोहिमेत मुंबई शहर जिल्ह्यातील जास्तीजास्त मतदारांनी सहभाग घ्यावा, असेही आवाहन मुंबई शहर जिल्हाधिकारी निवतकर यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -