Maharashtra Corona: कोरोना वाढत्या संसर्गामुळे राज्य नाट्य स्पर्धा लांबणीवर

state drama competition extended for corona patients increasing
Maharashtra Corona: कोरोना वाढत्या संसर्गामुळे राज्य नाट्य स्पर्धा लांबणीवर

ओमायक्रॉन विषाणू आणि कोरोना संसर्गाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून घालण्यात आलेल्या निर्बंधांच्या तसेच आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या खबरदारी घेण्याच्या सूचनेस अनुसरून व स्पर्धा पुढे घेण्यात यावी, अशी अनेक संघांनी ई मेल द्वारे व दूरध्वनीवरून केलेली विनंती लक्षात घेऊन, येत्या १५ जानेवारीपासून सुरू होणारी राज्य नाट्य स्पर्धा शासनाने तूर्तास पुढे ढकलली आहे.

विषाणू संसर्ग कमी झाल्यानंतर शासनाच्या त्यावेळी असंणाऱ्या नियमांस अनुसरून नवीन वेळापत्रकाची घोषणा करण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून कळविण्यात आले आहे.

दरम्यान राज्यात गेल्या २४ तासांत ४६ हजार ७२३ नव्या कोरोनाबाधितांची वाढ झाली असून ३२ जणांच्या मृत्यू नोंद झाली आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या ७० लाख पार झाली आहे. आतापर्यंत राज्यात ७० लाख ३४ हजार ६६१ कोरोनाबाधित आढळले असून यापैकी आतापर्यंत १ लाख ४१ हजार ७०१ जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात २ लाख ४० हजार १२२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच राज्यात आज दिवसभरात ८६ ओमिक्रॉनबाधित आढळले आहेत. पुणे मनपात ५३, मुंबईत २१, पिंपरी चिंचवडमध्ये ६, सातारामध्ये ३, नाशिकमध्ये २ आणि पुणे ग्रामीणमध्ये १ ओमिक्रॉनबाधित रुग्ण आढळला आहे. आतापर्यंत राज्यात एकूण १ हजार ३६७ ओमिक्रॉनबाधित आढळले असून यापैकी ७३४ जण बरे होऊन घरी गेले आहेत.


हेही वाचा – Maharashtra Mini Lockdown: ‘या’ भीतीमुळे फेब्रुवारीपर्यंत निर्बंधात शिथिलता नाही – राजेश टोपे