घरताज्या घडामोडीमहानिर्मिती राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार

महानिर्मिती राज्यात विविध ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार

Subscribe

महानिर्मिती कंपनीच्या राज्यातील विविध जागांवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यासाठी आज राज्य मंत्रिमंडळाने मंजूरी दिली. तसेच महानिर्मितीकडून भाग भांडवल उपलब्ध करून देण्यासही मान्यता दिली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते. १८७ मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांसाठी तसेच ३९० मेगावॅट क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पांसाठी दोन स्वतंत्र प्रस्तांवाना मंत्रिमंडळाने मान्यता दिली.

१८७ मेगावॅट क्षमतेच्या प्रकल्पांसाठी निधी उभारण्यास मंजूरी

मौजे कौडगाव, जिल्हा उस्मानाबाद येथे ५० मे.वॅ. क्षमतेचा, मौजे सिंदाला (लोहारा), जिल्हा लातूर येथे ६० मे.वॅ. क्षमतेचा तसेच औष्णिक विद्युत केंद्रामधील वापरात नसलेल्या जागेवर भुसावळ येथे २० मे.वॅ., परळी येथे १२, कोरडी येथे १२, व नाशिक ८ मे.वॅ. असे एकूण ५२ मे.वॅ. क्षमतेचे आणि मौजे शिवाजीनगर, साक्री जिल्हा धुळे येथे २५ मे.वॅ. क्षमतेचे सौरऊर्जा प्रकल्प असे एकूण १८७ मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्यात येणार आहेत.

- Advertisement -

या १८७ मे.वॅ. क्षमतेच्या प्रकल्पांकरीता, मेसर्स. केएफडब्लू-बँक जर्मनी यांनी साक्री १५० मे.वॅ. क्षमतेच्या सौर प्रकल्पाकरिता केलेल्या प्रकल्प अर्थ सहाय्य करार वाढवून २०११ मधील शिल्लक प्रकल्प अर्थ सहाय्य (अंदाजे ७२.८१ दशलक्ष युरो) मधून या प्रकल्पांना ५८८ कोटी २१ लाख रुपयांपर्यंत कर्जाची रक्कम केएफडब्लू – बँक जर्मनीकडून घेण्यासही मान्यता देण्यात आली. या प्रकल्पांकरिता राज्य शासनाच्या वतीने तसेच केंद्र शासनाच्या समन्वयाने आणि वित्त विभागाच्या सहमतीने करार करण्यास मान्यता देण्यात आली. हे प्रकल्प महानिर्मिती कंपनी मार्फत इंजिनिअरिंग – प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन (EPC) तत्वावर उभारण्यात येणार असून या १८७ मे.वॅ. क्षमतेच्या प्रकल्पांकरिता भाग भांडवल स्वरुपात सुमारे १५८ कोटी २९ लाख रुपयांचा निधी महानिर्मितीच्या अंतर्गत स्त्रोतांतून अथवा वित्तिय संस्थाकडून कर्जाद्वारे उभारण्यास मान्यता देण्यात आली. केएफडब्लूबँक जर्मनी यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची महानिर्मिती कंपनीद्वारे परतफेड करण्यात येईल.

३९० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार 

महानिर्मिती इंजिनिअरिंग – प्रोक्युरमेंट अँड कन्स्ट्रक्शन (EPC) तत्वावर वाशिम जिल्ह्यातील मौजे दुधखेडा, मौजे परडी ता. कमोर, मौजे कंझारा येथे अनुक्रमे ६० मेगावॅट, ३० मेगावॅट आणि ४० मेगावॅट असे एकूण १३० मेगावॅट क्षमतेचे तसेच वाशिम-१ प्रकल्पांतर्गत मौजे बाभूळगांव आणि मौजे सायखेडा येथे प्रत्येकी २० मेगावॅट असे एकूण ४० मेगावॅट क्षमतेचे तर वाशिम-२ प्रकल्पांतर्गत चंद्रपूर जिल्ह्यात मौजे कचराळा येथे १४५ मे.वॅ. क्षमतेचा तर यवतमाळ जिल्ह्यात मौजे मंगलादेवी, मौजे पिंपरी इजारा व मौजे मालखेड येथे प्रत्येकी २५ मेगावॅट असे एकूण ७५ मेगावॅट क्षमतेचे असे एकंदरीत ३९० मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प उभारणार आहे.

- Advertisement -

या प्रस्तावित ३९० मेगावॅट क्षमतेच्या सौर प्रकल्पांकरीता स्व-भागभांडवल वगळता १५६४ कोटी २२ लाख रुपये खर्चासाठी केएफडब्लूबँक, जर्मनी यांच्याकडून ०.०५ टक्के प्रतिवर्ष या दराने कर्ज घेण्यास मान्यता देण्यात आली. या कर्जाची कमाल १२ वर्षात परतफेड करण्याच्या अटीवर व नाविन्यपूर्ण प्रकल्प अटीनुसार नवीन प्रकल्प अर्थ सहाय्य मिळविण्याकरीताही मंजूरी देण्यात आली. या प्रकल्पांकरिता राज्यशासनाच्यावतीने तसेच केंद्र शासनाच्या समन्वयाने व वित्त विभागाच्या सहमतीने करार करण्यास मान्यता देण्यात आली. कर्जाव्यतिरीक्त लागणारे भाग भांडवल स्वरुपात सुमारे ३६४ कोटी १८ लाख रुपयांचा निधी त्यांच्या अंतर्गत स्त्रोतांतून अथवा वित्तीय संस्थाकडून कर्जाद्वारे उभारण्यासही मान्यता देण्यात आली. तसेच केएफडब्लू बँक जर्मनी यांच्याकडून घेतलेल्या कर्जाची महानिर्मिती कंपनीद्वारे परतफेड करण्यात येईल.


हेही वाचा – देशमुखांविरोधात भाजपचे कट-कारस्थान, एनआयएच्या चार्जशीटवर नवाब मलिकांची प्रतिक्रिया


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -