घरताज्या घडामोडीबंदी असलेल्या २० टन कॅरीबॅगचा साठा उल्हासनगरमध्ये जप्त

बंदी असलेल्या २० टन कॅरीबॅगचा साठा उल्हासनगरमध्ये जप्त

Subscribe

उल्हासनगर कॅम्प नंबर ३ पैनुमल कंपाऊंड या भागात हा कारखाना छुप्या पद्धतीने बंदी असलेल्या कॅरीबॅगचे उत्पादन करत होता. प्लास्टिक बंदीचा कायदा लागू झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे.

महाराष्ट्रात बंदी असलेल्या कॅरीबॅग उत्पादन करणाऱ्या उल्हासनगरमधील एका कारखान्यावर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने धाड टाकली आहे. या धाडीत जवळपास २० टनपेक्षा जास्त बंदी असलेल्या काळ्या रंगाचा कॅरीबॅगचा साठा जप्त करण्यात आला आहे. हा साठा महाराष्ट्रातील प्रमुख जिल्ह्यांमध्ये वितरित होण्याच्या तयारीत होते.

उल्हासनगर कॅम्प नंबर ३ पैनुमल कंपाऊंड या भागात हा कारखाना छुप्या पद्धतीने बंदी असलेल्या कॅरीबॅगचे उत्पादन करत होता. या संदर्भातील माहिती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहर संघटक मैनुद्दीन शेख यांनी महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला दिली होती. या माहितीच्या आधारे प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी प्रमोद लोणे यांनी उल्हासनगर महापालिकेच्या मदतीने कारखान्यावर सकाळच्या सुमारास धाड टाकत कारवाई केली. त्या ठिकाणी ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचा आणि बंदी असलेल्या कॅरीबॅगचे उत्पादन मोठ्या प्रमाणात केले जात होते. हा साठा जवळ्पास २० टनापेक्षा अधिक असल्याचे लोणे यांनी सांगितले. यावेळी पालिका प्रशासनाने उपायुक्त संतोष देहेरकर, सहाय्यक आयुक्त गणेश शिंपी, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे, एकनाथ पवार, स्वच्छता निरीक्षक बिन्नीवाले आदी उपस्थित होते.

- Advertisement -

दरम्यान, प्लास्टिक बंदीचा कायदा लागू झाल्यानंतर ठाणे जिल्ह्यातील ही सर्वात मोठी कारवाई असल्याचे म्हटले जात आहे. याबाबत उपायुक्त संतोष देहेरकर यांनी सांगितले की १ मे पर्यंत उल्हासनगर शहर हे प्लॅस्टिक मुक्त करायचे आहे. त्यामुळे आपल्या परिसरात सुरू असलेल्या प्लास्टिक पिशव्या उत्पादन कारखान्यांची माहिती पालिका प्रशासनाला द्या, असे आवाहन पालिका उपायुक्त संतोष देहेरकर यांनी केली आहे.


हेही वाचा – ठाण्यात एसआरए योजनेत ३०० फूटांचे घर

अंबरनाथ मध्ये पकडला गेलेले चार टन प्लॅस्टिक उल्हासनगरचे

उल्हासनगर शहरांमध्ये अनेक भागात छुप्या पद्धतीने बंदी असलेल्या प्लास्टिकच्या बॅगांचे उत्पादन चालू आहे. ह्या कारखान्यांमध्ये उत्पादित होणाऱ्या प्लॅस्टिक पिशव्या ह्या महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यात वितरित करण्यासाठी ट्रान्सपोर्ट यंत्रणेचा वापर केला जात आहे. पंधरा दिवसांपूर्वी अंबरनाथ नगर परिषदेने सांगलीला निघालेला चार टन प्लॅस्टिकचा ट्रक पकडला होता. तसेच मागील आठवडयात पालिकेच्या मागच्या बाजूला असलेल्या भाटिया ट्रान्सपोर्ट मधून उल्हासनगर बाहेर चाललेले १ टन प्लॅस्टिक पकडले होते.

- Advertisement -

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -