Eco friendly bappa Competition
घर महाराष्ट्र प्राध्यापकांच्या वेतनावरून चंद्रकांत पाटलांवर सुप्रिया सुळे संतप्त, 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' नसल्याचे सुनावले

प्राध्यापकांच्या वेतनावरून चंद्रकांत पाटलांवर सुप्रिया सुळे संतप्त, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नसल्याचे सुनावले

Subscribe

मुंबई : खासगी महाविद्यालयांनी शुल्क कमी करावे, प्राध्यापकांच्या वेतनाची जबाबदारी घेईल, अशी भूमिका उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली होती. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी जोरदार टीका करत, ही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नाही, असे सुनावले. राज्यातील मंत्री ऊठसूठ बेजबाबदारपणे वक्तव्य करीत असल्याने महाराष्ट्राची काळजी वाटत आहे, असेही त्या म्हणाल्या.

राज्यातील खासगी महाविद्यालये जास्त शुल्क आकारत असल्याने शिक्षण महाग झाले आहे. प्राध्यापकांचे वेतन याच शुल्कातून केले जात असल्याचे कारण महाविद्यालयांकडून दिले जाते. राज्य सरकार खासगी महाविद्यालयांतील प्राध्यापकांच्या वेतनाची जबाबदारी घेईल, पण महाविद्यालयांनी शुल्क कमी करावे, अशी भूमिका चंद्रकांत पाटील यांनी मांडली होती. आजमितीस उच्च शिक्षणासाठी 12 हजार कोटी खर्च होतात. आता खासगी महाविद्यालयांतील प्राध्यापकांचे वेतन द्यायचे झाल्यास आणखी 13000 कोटी रुपये लागतील. ते उपलब्ध करता येतील, असे चंद्रकांत पाटील म्हणाले होते.

- Advertisement -

हेही वाचा – केरळमधील RSSचे नेते PFIच्या निशाण्यावर; केंद्र सरकारकडून सुरक्षेत वाढ

त्यावरून खासदार सुप्रिया सुळे या संतप्त झाल्या. एक मंत्री जेव्हा बोलत असतो, तेव्हा ते हलक्यात घ्यायचे नसते. तसेच ते चेष्टवारी न्यायचे नाही आणि त्याची चेष्टाही करायची नाही. ही काही ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ नाही, असे त्यांनी चंद्रकांत पाटील यांना फटकारले. तुम्ही राज्याचे मंत्री आहात. त्यामुळे भाषण करताना विचार करूनच बोला. गंमत जमंत करायचा अधिकार तुम्हाला नाही, असे त्यांनी सुनावले.

- Advertisement -

निधी तयार असेल म्हणूनच इतका मोठा मंत्री बोलत असेल आणि निधी उपलब्ध केल्याशिवाय योजना कशी जाहीर करायची? हे शक्य आहे की अशक्य हे संबंधित मंत्र्यांनी बघितले पाहिजे. खासगी महाविद्यालयातील प्राध्यापकांचे वेतन सरकार करणार असेल, याबाबत अर्थमंत्र्यांशी चर्चा झाली आहे का? तेवढा निधी तुम्ही उपलब्ध केला आहे का?, अशा प्रश्नांची सरबत्तीच त्यांनी केली.

हेही वाचा – स्पिकर असतानाही मोदींनी नागरिकांशी माईक न घेता साधला थेट संवाद, कारण…

Manoj Joshi
Manoj Joshihttps://www.mymahanagar.com/author/mjoshi/
प्रिंट, चॅनल आणि डिजिटल या तिन्हीचा अनुभव.
- Advertisment -