घरताज्या घडामोडीडॉ. सुधीर तांबेंवर काँग्रेस पक्षातून निलंबनाची कारवाई, उमेदवारीप्रकरणी चौकशी होणार

डॉ. सुधीर तांबेंवर काँग्रेस पक्षातून निलंबनाची कारवाई, उमेदवारीप्रकरणी चौकशी होणार

Subscribe

नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत डॉ. सुधीर तांबे आणि युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या विरोधात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पक्षानं अधिकृत उमेदवारी जाहीर करून आणि एबी फॉर्म देऊनही सुधीर तांबे यांनी अचानक निवडणुकीतून माघार घेतली. तसेच मुलाच्या अपक्ष उमेदवारीला पाठिंबा दिला. त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून डॉ. सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

सुधीर तांबे यांच्यावर पक्षाकडून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. यासंदर्भातील अहवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने हाय कमांडला पाठवला होता. आज हाय कमांड आणि नेतृत्वाने निर्णय घेत सुधीर तांबे यांच्यावर कारवाई केली आहे. जोपर्यंत संपूर्ण चौकशी होत नाही तोपर्यंत सुधीर तांबेंना पक्षातून निलंबन करण्यात आलं आहे.

- Advertisement -

तांबे पिता-पुत्रांविरोधात नाना पटोले यांनी दिल्लीत तक्रार दाखल करत कारवाईची मागणी केली होती. त्यांनी नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी ते म्हणाले होते की, सगळ्या घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. नाशिकमध्ये जे काही घडलं, ते हायकमांडला कळवलं आहे. हायकमांडचा निर्णय आज अपेक्षित आहे. त्यानुसार कारवाई केली जाईल. बंडखोर उमेदवाराला काँग्रेस पाठिंबा देणार नाही, असंही स्पष्टीकरण नाना पटोले यांनी दिलं होतं.

- Advertisement -

पक्षानं सुधीर तांबे यांना तिकीट दिलं होतं. त्यांनी फॉर्म न भरता पक्षाची फसवणूक केली आहे. स्वत:च्या मुलाला अपक्ष उभे करून ते भाजपचा पाठिंबा घेणार आहेत. ही एक प्रकारची दगाबाजी आहे, असाही संताप पटोले यांनी व्यक्त केला होता. त्यानुसार तांबेंवर आज काँग्रेस पक्षाकडून कारवाई करण्यात आली आहे. यावर तांबे काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.


हेही वाचा : पदवीधर निवडणूक : उमेदवार बदलाबाबत कोणतीही चर्चा झाली नाही; नाना पटोलेंचे


 

mayur sawant
mayur sawanthttps://www.mymahanagar.com/author/mayursawant/
२ वर्षांपासून माध्यम क्षेत्रात सक्रिय. राजकीय, क्रीडा विषयात लिखाण. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -