घरमहाराष्ट्रउत्तर महाराष्ट्रडॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवल्याने तणाव; नागरिकांचा रास्तारोको

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हटवल्याने तणाव; नागरिकांचा रास्तारोको

Subscribe

नाशिक : शहरातील नाशिकरोड भागात असलेल्या जय भवानी रोड येथील महानगरपालिकेच्या उद्यानात ६ डिसेंबर महापरिनिर्वाण दिनी काही नागरिकांनी एकत्र येत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवला होता. त्याबाबत वाद निर्माण झाला होता. पुतळा अनधिकृत रित्या बसवण्यात आल्याची तक्रार देण्यात आल्यानंतरच खर्‍या अर्थाने तणावाची पहिली ठिणगी पडली होती. त्यातच आता मध्यरात्री अचानक उद्यानातून पुतळा हटवण्यात आल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. ही बाब सकाळी समजताच मोठ्या संख्येने नगरीयकांनी एकत्र येत रोष व्यक्त केला आहे. त्याचसोबत जय भवानी रोड येथे रास्तारोको करत जोपर्यंत पुन्हा पुतळा बसवला जात नाही आम्ही हटणार नाही अशी भूमिका घेतल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.

त्याचसोबत आमरण उपोषण करण्याचा इशाराही जमलेल्या नागरिकांनी दिल्याने आणि गर्दी मोठ्या प्रमाणात वाढल्याने तसेच परिसरात जोरदार घोषणाबाजी होत असल्याने जय भवानी रोड परिसरात तणाव पूर्ण वातावरण तयार झाले आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस यंत्रणाही सतर्क झाली असून याठिकाणी पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
नाशिकमधील नाशिक रोड परिसरात असलेल्या जय भवानी रोडवरील महानगरपालिका प्रशासनाच्या उद्यानातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा महापालिका प्रशासनाने मध्यरात्री हटवल्याचा आरोप यावेळी नागरिकांकडून करण्यात आला. यामुळे परिसरातील नागरिक आक्रमक झाले. आज या परिसरात नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन करत आमरण उपोषणाला सुरवात करण्यात आली.

- Advertisement -

आंदोलन स्थळी मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी तयार झाली होती. आंदोलक महापालिका प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत होते. आंदोलक हे काहीसे आक्रमक झाल्याचे पाहायला मिळालं. मात्र पोलीस प्रशासनाच्या यशस्वी मध्यस्थीने आंदोलक शांत झाले आणि ज्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा होता. त्याठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा बसवून आंदोलकांनी बुद्ध वंदना सादर केली. आंदोलक काहीसे शांत झाल्याचे दृश्य असलं तरी जोपर्यंत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवण्यात येत नाही, तोपर्यंत साखळी उपोषण हे चालूच राहील असा दावा आंदोलकांकडून करण्यात आलेला आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -