कुणी कसा डाव खेळला, कशा प्रकारे पक्षाला फसवलं हे आज सिद्ध होईल; अनिल देसाईंचा विश्वास

धनुष्यबाण आणि शिवसेना पक्ष कुणाचा ठाकरेंचा की शिंदेंचा यावर आज पुन्हा केंद्रीय निवडणूक आयोगात सुनावणी होणार आहे. आज दुपारी 3 वाजता ही सुनावणी होणार आहे. यावर कुणी कसा डाव खेळला, कशा प्रकारे पक्षाला फसवलं हे आज सिद्ध होईल, असा विश्वास आज ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाईं यांनी व्यक्त केला आहे. तसेच वकील कपिल सिब्बल ठाकरे गटाची बाजू मांडणार आहे. यावर योग्य न्याय व्हावा अशी आमची अपेक्षा असल्याचं मत अनिल देसाईंनी व्यक्त केलं आहे.

कुणी कसा डाव खेळला, कशाप्रकारे पक्षाला फसवलं हे आज सिद्ध होईल

यावर बोलताना अनिल देसाई म्हणाले की, पंतप्रधान मोदी काल जे म्हणाले त्या गोष्टीही सुमोटो, केंद्र निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट यांच्याजवळ जात आहेत. यातून त्यांचा कशाप्रकारे प्लॅन होता, कशाप्रकारे डाव खेळला, कशाप्रकारे पक्षाला फसवलं गेलं? मग पक्षामध्ये वाद होता का? जे महत्वाचे मुद्दे आहेत, ते येणाऱ्या निकालातून आज सिद्ध होतील.

अनिल देसाई पुढे म्हणाले की, कायद्यानुसार ज्या गोष्टी लागतात, त्यामध्ये दोन गटांमध्ये वाद होते, अशाप्रकारची जी काही वक्तव्य ज्यापद्धतीने त्यांच्या वेगवेगळ्या माध्यमातून समोर आली आहेत, या सगळ्या वक्तव्यांची महत्त्वाच्या संस्था सुमोटो, केंद्र निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट दखल घेतात. त्याचाही महत्वाचा परिणाम येणाऱ्या निकालातून असणार आणि तो असलाच पाहिजे. कारण भारताची लोकशाही आपण अभिमानाने मिरवतो त्या लोकशाहीमध्ये काय गोष्टी, तत्व, मूल्य असतात या गोष्टींना महत्त्व असतं. आणि त्या गोष्टी अबाधित राहतील, असा विश्वासही अनिल देसाईंनी व्यक्त केला आहे.

शिंदे कोणाचा माणूस आहे हे त्यांनीच सांगितलं

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या कालच्या भाषणातील मुद्द्यावरील एका प्रश्नावर अनिल देसाई म्हणाले की, त्यांनी स्वत:च सांगितले की, ते कोणाचा माणूस आहे. कोणाचा माणूस म्हटल्यानंतर पंतप्रधानांचे तर सगळेच असतात. देशाच्या पंतप्रधानांबद्दल हे असणं स्वाभाविक आहे. परंतु इथे त्यांना राजकीय संबंध द्यायचा होता त्यांनी तो दिला, महाराष्ट्राला कळतं कोण कोणाचे आहेत आणि कोण कोणाचे होते, त्यामुळे त्यांच्याच बोलण्यातून ते उघड झालं आहे, असे देसाई यांनी म्हटले आहे.


स्वदिच्छाच्या प्रकरणाला वेगळं वळण देण्याचा प्रयत्न; वडिलांचे पोलीस तपासावर प्रश्नचिन्ह