घरताज्या घडामोडीफोडाफोडीच्या सीझन 2मध्ये भाजपाला यश मिळणार नाही - संजय राऊत

फोडाफोडीच्या सीझन 2मध्ये भाजपाला यश मिळणार नाही – संजय राऊत

Subscribe

खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी राऊतांनी भाजपावर निशाणा साधला. "मागील आठवड्यात मी आणि उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. आमच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यामध्ये महाविकास आघाडीच्या संदर्भात, राज्यातील राजकारण यावरही चर्चा झाली.

जसे के.बी.सी. वैगरे इतर कार्यक्रम असतात. त्यामध्ये सीझन 1, सीझन 2, सीझन 3 असतात. तसाच फोडाफोडीचा सीझन 1 कार्यक्रम झाला. आमचे लोकं फोडली. आता भाजपा सीझन 2 च्या मागे लागले असून, या सीझन 2मध्ये त्यांना चांगले यश मिळणार नाही’, अशा शब्दांत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपावर टीका केली. (Thackeray Group MP Sanjay Raut Slams Bjp On NCP)

खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बातचीत केली. त्यावेळी राऊतांनी भाजपावर निशाणा साधला. “मागील आठवड्यात मी आणि उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती. आमच्यात विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. यामध्ये महाविकास आघाडीच्या संदर्भात, राज्यातील राजकारण यावरही चर्चा झाली. त्यावेळी चर्चेदरम्यान केंद्रीय तसाप यंत्रणांचा दुरूपयोग किंवा दबाव सत्तेचा दबाव “वापरून विरोधी पक्षातील आमदार फोडायचे. दहशत निर्माण करायची. शिवसेनेच्या बाबतीत त्यांनी तेच तंत्र वापरले होते. आदित्य ठाकरेंनी सांगितल्याप्रमाणे प्रमुख नेते तपास यंत्रणांच्या भीतीने रडत होते. तुरुंगाच जायची त्यांना भीती होती. मात्र हेच तंत्र आता राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस विरोधात वापरले जात आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

“आमच्या चर्चेदरम्यान शरद पवार यांनी सांगितले की, काही झाले तरी पक्ष म्हणून भाजपा जाणार नाही. किती दबाब असला तरी आम्ही जाणार नाही. याउपर काही दबाव असेल तर, तो आमदारांच्या कुटुंबावर दबाव टाकला जात आहे. घरातील मुलांना, महिलांना चौकशीसाठी बोलवले जात आहे. हेच आमदार दबावाखाली येऊन निर्णय घेताता, त्यावेळी तो आमदारांचा निर्णय असतो, पण पक्षाचा निर्णय नसतो” असेही संजय राऊत म्हणाले.

“पवार कुटुंबावर तपास यंत्रणांकडून नोटीर जारी करण्यात आल्या आहेत. पवार कुटुंबातील लोकांवर छापे टाकले जात आहेत. कोल्हापुरात आपण पाहिले असेल, अजित पवार यांच्यामागे चौकशा लावल्या जात आहेत. रोहित पवारांना सातत्याने चौकशीसाठी नोटीस जारी केल्या जात आहेत. आमच्यावरही चौकशीच्या नोटीसा पाठवल्या जात आहेत. पण आम्ही सातत्याने लढत राहू” असेही संजय राऊत म्हणाले.

- Advertisement -

“अजित पवार हे महाविकास आघाडीचे प्रमुख नेते आहे. अजित पवारांच्या खांद्यावर महाविकास आघाडीची धुरा आहे. जसे के.बी.सी. वैगरे इतर कार्यक्रम असतात. त्यामध्ये सीझन 1, सीझन 2, सीझन 3 असतात. तसाच फोडाफोडीचा सीझन 1 कार्यक्रम झाला. आमचे लोकं फोडली. आता भाजपा सीझन 2 च्या मागे लागले असून, या सीझन 2मध्ये त्यांना चांगले यश मिळणार नाही”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी भाजपावर हल्लाबोल केला.


हेही वाचा – माझ्यावर सगळ्यांचे प्रेम का ऊतू चालले आहे? अजितदादांचा शिंदे गटातील नेत्यांना सवाल

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -