घरट्रेंडिंगलॉकडाऊनचे सर्वाधिकार राज्यांना

लॉकडाऊनचे सर्वाधिकार राज्यांना

Subscribe

केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांची माहिती; 25 राज्यांना केंद्राच्या गाईडलाईन्स

नाशिक : कोरोनाच्या दुसर्‍या लाटेतील ‘डेल्टा’ या विषाणूपेक्षाही तिप्पट वेगाने पसरणार्‍या ‘ओमायक्रॉन’चे रुग्ण देशात वाढत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने पुन्हा निर्बंध लावण्याचे आदेश राज्यांना दिले असले तरी, पूर्णत: लॉकडाऊन करण्याचे अधिकार राज्य सरकारला बहाल केल्याची माहिती केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी ‘आपलं महानगर’शी बोलताना दिली.

देशात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्याने आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १५ वर्षावरील व्यक्तींना कोरोना लस देण्याचा निर्णय घेतला आहे. त्याची अंमलबजावणी येत्या ३ जानेवारीपासून होणार आहे. वयोवृद्ध व्यक्तींना तिसरा डोस १०  जानेवारीपासून देण्यात येईल. ओमायक्रॉनचा धोका वाढत असला तरी ब्रिटन, यूके या देशांच्या तुलनेत भारतात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण अधिक आहे. भारतीय लोकांची रोगप्रतिकारक शक्ती अधिक असल्याचे यातून दिसून येते. परंतु, केवळ यावर विसंबून न राहता, लसीकरणाचा वेग वाढण्याची नितांत आवश्यकता असल्याचेही मंत्री डॉ. पवार यांनी सांगितले. कोरोनाच्या दुसर्‍या लाटेचा अर्थात ‘डेल्टा’ या विषाणूचा धोका अजूनही टळलेला नाही.

- Advertisement -

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या देशात वाढत असल्याचे चित्र आहे. कोरोना प्रतिबंधक लस घेतलेल्या रुग्णांमध्ये प्रतिकारशक्ती अधिक असल्याने त्यांना ओमायक्रॉनपासून कमी धोका आहे. कोरोनावर प्रभावी औषध नसल्याने लसीकरण हाच पर्याय सध्या उपलब्ध असल्याने नागरिकांनी दोन्ही डोस पूर्ण करुन घेतले पाहिजे. वयोवृद्ध व्यक्तींना बूस्टर डोस दिला जाणार आहे. त्याची सुरुवात १० जानेवारीपासून करण्यात येणार असल्याची माहिती डॉ. पवार यांनी दिली. दरम्यान, लोकसभेच्या अधिवेशनानंतर मंत्री डॉ.भारती पवार या राज्याच्या दौर्‍यावर आहेत. ठाणे, कोल्हापूर, सांगली, सातारा, उस्मानाबाद येथे आढावा बैठका घेत आहेत.

डेल्टा’चा एक तर ओमायक्रॉनचे तीन रुग्ण

‘डेल्टा’ या विषाणूपेक्षा ओमायक्रॉन हा तीनपट अधिक वेगाने पसरतो. त्यामुळे ‘डेल्टा’चा एक रुग्ण असेल तर ओमायक्रॉनचे तीन रुग्ण सापडतील. वेगाने पसरणार्‍या ओमायक्रॉनचे रुग्णही बरे होतात. आरोग्य विभागासह जगभरातील संशोधक यावर प्रभावी औषध शोधण्याच्या प्रयत्नात आहेत. अद्याप त्यांना यश आलेले नाही.

Kiran Kawade
Kiran Kawadehttps://www.mymahanagar.com/author/kiran-kawade/
गेल्या १० वर्षांपासून पत्रकार म्हणून कार्यरत. राजकीय, शैक्षणिक आणि कृषी विषयांवर विपुल लेखन. प्रिंट आणि डिजिटल मीडियाचा अनुभव.
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -