घरमहाराष्ट्रज्या जंगलाचा राजा गाढव असेल..., संजय राऊत यांच्या री-ट्वीटची चर्चा

ज्या जंगलाचा राजा गाढव असेल…, संजय राऊत यांच्या री-ट्वीटची चर्चा

Subscribe

मुंबई : राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन सुरू आहे. या निमित्ताने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न, नागपूरचा एनआयटी घोटाळा तसेच आता अभिनेता सुशांतसिह राजपूत मृत्यू प्रकरणावरून आरोप-प्रत्यारोप होऊ लागले आहेत. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी ‘गाढव राजा’बद्दल केलले्या री-ट्वीटची चर्चा सध्या सुरू आहे.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी गेल्या आठवड्यात दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई उपस्थित होते. हा वाद सर्वोच्च न्यायालयात असल्याने न्यायालयाचा निर्णय येईपर्यंत दोन्ही राज्यांनी कोणताही वाद घालू नये, कोणताही दावा करू नये, असे निर्देश अमित शहा यांनी या बैठकीत दिले होते. मात्र, तरीही दोन्ही राज्यांकडून यावर प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. त्यावरूनही विधिमंडळात आणि बाहेरही त्याचे पडसाद उमटले.

- Advertisement -

नागपुरातील एनआयटीचा 83 कोटींचा भूखंड विद्यमान मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी बिल्डरांना अवघ्या 2 कोटी रुपयांत विकल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. त्यामुळे शिंदेंनी राजीनामा देण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा हा आरोप फेटाळून लावला आहे.

- Advertisement -

त्यातच काल शिंदे गटाने, अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या तपासात ठाकरे गटाचे आमदार व माजी मंत्री आदित्य ठाकरे यांचा अप्रत्यक्ष उल्लेख असल्याचा आरोप केला. त्यावरूनही आता राजकारण रंगले आहे. यासर्व पार्श्वभूमीवर खासदार संजय राऊत यांनी ट्वीट केले आहे. ‘जिस जंगल का राजा गधा हो, वहाँ लोमड़ी की बुद्धि और शेर की ताक़त के साथ कभी न्याय नहीं हो सकता।’ (ज्या जंगलाचा राजा गाढव असेल, तिथे कोल्ह्याचे चातुर्य आणि सिंहाच्या ताकदीला न्याय मिळू शकणार नाही.) असे या री-ट्वीट संजय राऊत यांनी केले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -