घरमहाराष्ट्रआशिष शेलार यांच्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी

आशिष शेलार यांच्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी

Subscribe

मुंब्य्रातून एकाला अटक

भाजप नेते आमदार आशिष शेलार यांच्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. एका अज्ञात व्यक्तीने मोबाईलवरून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे आशिष शेलार यांनी पोलीस आयुक्तांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे. राज्यातील सरकारविरोधात टीका करत असल्याने शेलार यांना धमकी देण्यात आल्याचा आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

आशिष शेलार यांनी दोन वेगवेगळ्या फोन नंबरवरून अज्ञात व्यक्तींकडून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करण्यात येत होती. सातत्याने आशिष शेलार यांच्यासह कुटुंबियांना जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात होत्या. मुंबईतील अनेक प्रश्नांवर आशिष शेलार आक्रमक भूमिका घेत असतात. मुंबईतील भ्रष्टाचार किंवा सत्ताधारी पक्षांच्या निर्णयावर आशिष शेलार विधानसभेतही आवाज उठवत असतात. शेलार यांनी यासंदर्भात पोलीस आयुक्तांना पत्र लिहून तक्रार केली आहे. या पत्रात त्यांनी दोन्ही अज्ञात मोबाईल नंबरची माहिती देत तपास करण्याची मागणी केली आहे. याप्रकरणी ते राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनाही पत्र लिहून तातडीने कारवाई करण्याची मागणी करणार आहेत.

- Advertisement -

२०२० मध्येही आशिष शेलार यांना जीवे मारण्याची धमकी देणार्‍या एका आरोपीला वांद्रे पोलिसांनी मुंब्रा येथून अटक केली होती. तर यापूर्वी दहशतवाद्यांकडूनही आशिष शेलार यांच्यासह दोन हिंदुत्ववादी व्यक्तींची रेकी केल्याची माहिती समोर आली होती. आता पुन्हा अतिरेक्यांकडून नागपुरात संघ मुख्यालयाची रेकी करण्यात आल्याचे उघड झाले असून, त्याच दरम्यान गेले दोन दिवस आमदार शेलार यांना धमकीचे फोन येत असल्याचे सांगितले जाते.

सरकारविरोधात टीकेमुळे धमकी – देवेंद्र फडणवीस
आशिष शेलार हे सातत्याने सरकारच्या विरोधात भूमिका मांडत असतात. सरकारमधील भ्रष्टाचार असेल, सरकारमधील अनागोंदी कारभार ते बाहेर आणतात, संघर्ष करतात. त्यामुळे अशाप्रकारची धमकी आली असेल. पोलिसांनी ही धमकी गांभीर्याने घेतली पाहिजे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -