घरमहाराष्ट्रबुवा, महाराजांचा सत्कार करून...; खारघर कार्यक्रमावरून उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

बुवा, महाराजांचा सत्कार करून…; खारघर कार्यक्रमावरून उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

Subscribe

 

जळगावः बुवा, महाराजांचा सत्कार करुन त्यांच्या शिष्यांना भारावून टाकायचं. म्हणजे ते आपले मतदार होतील, ही भाजपची विकृती आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी खारघर येथे झालेल्या महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यावर केली. डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांना या सोहळ्यात महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला होता.

- Advertisement -

जळगाव येथील पाचोरा येथे महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा रविवारी आयोजित करण्यात आली होती. या सभेत उद्धव ठाकरे यांनी खारघर येथील पुरस्कार सोहळ्यावर निशाणा साधला. मी बुवा किंवा महाराज नाही. पण समजा मी बुवा किंवा महाराज असतो तर माझा सत्कार करायचा. म्हणजे माझे शिष्य भारावून जातील आणि आमचे मतदार होतील, ही भाजपची विकृती आहे. स्वतःकडे चेहरा नाही. म्हणून दुसऱ्याचा बाप चोरायचा. आई चोरायची ही यांची खेळी आहे, असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजपला लगावला.

खारघर दुर्घटनेत १४ जणांचा मृत्यू झाला, असे सांगत उद्धव ठाकरे म्हणाले, माझे हिंदुत्त्व शेंडी- जान्वायचं हिंदुत्त्व नाही. मी मुख्यमंत्री असताना सर्वांना एकत्र घेऊन चाललो होतो. आता हे काय करत आहेत. आपल्याकडे गोमांस बंदी. पण गोवा आणि अन्य काही राज्यांमध्ये गोमांस बंदी नाही. आपल्याकडे गोमांसची वाहतूक करताना दिसला की त्याची हत्या केली जाते. हे कोणते हिंदुत्त्व आहे. हिंदुत्त्वाची व्याख्याचं अजून भाजपला कळलेली नाही. हिंदुत्त्व करण्यापेक्षा आधी महिलांना सुरक्षा द्या. ठाण्यात महिलेवर हल्ला झाला. जिच्यावर हल्ला झाला तिची तक्रार अद्याप नोंदवण्यात आलेली नाही. मात्र हल्ला करणाऱ्यांनी त्या पीडित महिलेविरुद्ध तक्रार केली तर त्याचा लगेच गुन्हा नोंदवण्यात आला. हे भाजपंच हिंदुत्त्व आहे, असा आरोप उद्धव ठाकरे यांनी केला.

- Advertisement -

राहुल गांधी यांनी अदानी यांच्याबाबत प्रश्न विचारले. पण त्यांची उत्तर कोणी दिली नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा व्हिडिओ मला दाखवायचा होता. त्या व्हिडिओमध्ये मोदी महागाईवर बोलत होते. अबकी बार म्हणत होते. अरे किती वेळा म्हणाल अब की बार. आता अब की बार नही आपटी बार होणार आहे, अशी टीका उद्धव ठाकरे यांनी केली.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -