‘वृद्धाश्रमातही जागा नाही, असे राज्यपाल…’; उद्धव ठाकरेंचा कोश्यारींना टोला

असा प्रघात आहे, की ज्याचं सरकार केंद्रात असतं, त्यांच्याच विचारांची माणसं सगळ्या राज्यांत राज्यपाल म्हणून पाठवली जातात. या माणसांची कुवत, पात्रता काय असते? ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का? हा प्रश्न केंद्राला विचारायला हवा. राज्यपाल नियुक्तीचेही निकष ठरवायला हवेत, असं माझं ठाम मत आहे, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला.

असा प्रघात आहे, की ज्याचं सरकार केंद्रात असतं, त्यांच्याच विचारांची माणसं सगळ्या राज्यांत राज्यपाल म्हणून पाठवली जातात. या माणसांची कुवत, पात्रता काय असते? ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का? हा प्रश्न केंद्राला विचारायला हवा. राज्यपाल नियुक्तीचेही निकष ठरवायला हवेत, असं माझं ठाम मत आहे, अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर निशाणा साधला. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले केलेल्या विधानावर उद्धव ठाकरे यांनी संताप व्यक्त केला. (Uddhav Thackeray Slams Maharashtra Governor Bhagatsingh Koshyari)

गुरूवारी संध्याकाळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी ते म्हणाले की, “असा प्रघात आहे, की ज्याचं सरकार केंद्रात असतं, त्यांच्याच विचारांची माणसं सगळ्या राज्यांत राज्यपाल म्हणून पाठवली जातात. या माणसांची कुवत, पात्रता काय असते? ज्यांना वृद्धाश्रमातही जागा नाही, अशांना राज्यपाल म्हणून नेमलं जातं का? हा प्रश्न केंद्राला विचारायला हवा. राज्यपाल नियुक्तीचेही निकष ठरवायला हवेत, असं माझं ठाम मत आहे. राज्यपाल राष्ट्रपतींचे दूत असतात. राष्ट्रपती नि:पक्ष असायला हवेत, तसेच राज्यपालही असायला हवेत. मात्र, राज्यपाल जे काही बोलतात, ते गांभीर्यानं घेण्याची गरज आहे. आपल्या राज्यपालांना राज्यपाल म्हणणं मी सोडून दिलं आहे. राज्यपाल पदाचा मी मान करत आलो आहे, यापुढेही करेन. पण राज्यपालपदाची झूल कुणी पांघरली, म्हणजे त्यांनी वेडंवाकडं काहीही बोलावं हे मी आणि महाराष्ट्र मान्य करेल असं मला वाटत नाही”, असे उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

“या कोश्यारींनी काही दिवसांपूर्वी मुंबई आणि ठाण्यातील मराठी माणसांचा अपमान केला होता. त्यावेळी मी त्यांना कोल्हापूरी जोडा दाखवण्याची वेळ आली आहे, असे म्हटले होते. मात्र त्यानंतरही राज्यपाल थांबले नाहीत. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा आक्षेपार्ह विधान केले. मात्र, छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल त्यांनी केलेले हे विधान त्यांच्या काळ्या टोपीतून आले नसून त्याच्यामागे कोणी आहे. राज्यपालांच्या सडक्या मेंदू मागे कोण आहे का याचा शोध घेण्याची आता वेळ आली आहे”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले

याशिवाय, “कारण हळुवारपणे महाराष्ट्रातील आदर्शांचा अपमान करायाचा. सातत्याने हे आपमान करायाचा आणि महाराष्टारातील नागरिकांच्या मनातील आदर्श पूसून टाकून त्यांच्या पक्षातील नेत्यांचे आदर्श म्हणून प्रतिमा त्यांच्या मनात बिंबवण्याची आणि ठसवण्याची त्यांची सतत चाललेली वृत्ती आहे तिचा आम्ही निषेध केला आहे. परंतु, आता हे महाराष्ट्राच्या अस्मितेशी खेळ करत आहेत. महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला घेऊन गेले. कालही या सरकारमधील लोकांनी मंत्रिमंडळाची बैठक पुढे ढकलली आणि गुजरातला गेले. इकडे महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न असताना हे तिकडे जात आहेत”, अशा शब्दांत राज्यपालांवर टीका करताना ठाकरेंनी भाजपावरही निशाणा साधला.


हेही वाचा – ‘महाराष्ट्राची सातत्याने अवहेलना होतेय, कोणी यावे टपली मारावी…’; उद्धव ठाकरेंची कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांवर टीका