घरमहाराष्ट्रSanjay Raut : पारदर्शक निवडणुकांची गॅरंटी कोण देणार? संजय राऊतांचा सवाल

Sanjay Raut : पारदर्शक निवडणुकांची गॅरंटी कोण देणार? संजय राऊतांचा सवाल

Subscribe

मुंबई : बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम शनिवारी जाहीर झाला आणि राजकीय पक्षांच्या धावपळीला सुरुवात झाली. देशात सात तर राज्यात पाच टप्प्यात मतदान होणार आहे. या निवडणुका जाहीर झाल्यानंतर शिवसेना उद्धव गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. निवडणूक आयोगाला निवडणुका जाहीर कराव्या लागल्या आहेत, पण त्या पारदर्शक पद्धतीने होतील, याची गॅरंटी कोण देणार, असा सवाल त्यांनी केला आहे.

मोदी सुद्धा याची गॅरंटी देणार नाहीत

देशाला आणि नागरिकांना वेगवेगळ्या प्रकारच्या गॅरंटी देणारे मोदी पारदर्शक पद्धतीने निवडणुका होण्याची गॅरंटी देऊ शकतात का, या प्रश्नाचे उत्तर स्वतः संजय राऊत यांनीच नाही असे दिले आहे. मुळात मोदी आणि निवडणूक आयोग या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्याची खरमरीत टीका त्यांनी केली. गेल्या काही काळातील त्यांच्या निर्णयावरून हे स्पष्ट होत असल्याचंही ते म्हणाले. त्यामुळे निवडणुका पारदर्शक करण्याची गॅरंटी मोदींनी घ्यावी, असे आवाहनही राऊतांनी केले. मुळात या देशातील राजकीय पक्षांचा, लोकांचा ईव्हीएम मशीनवर विश्वास नाही, तरीही आम्ही त्याच्या साहाय्याने निवडणुकांना सामोरे जात आहोत, त्यामुळे तर पारदर्शक निवडणुकांची गॅरंटी आणखी गरजेची असल्याचेही ते म्हणाले. अन्यथा, निवडणूक आयोग देखील इतर केंद्रीय तपास यंत्रणांप्रमाणे त्यांच्या हातातील बाहुलं झालं आहे का, असा प्रश्न पडेल.

- Advertisement -

हेही वाचा – PM Modi : आम्हाला शिव्या देणे आणि व्होट बँकेचे राजकारण एवढा एकच अजेंडा, मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

मविआत ऑल इज वेल

लोकसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या तरीही अद्याप मविआचे जागावाटप झालेले नाही, ते कधी होणार, याची विचारणा केली असता, आमची यादी तयार आहे, केवळ अखेरचा हात फिरणे बाकी असल्याचे राऊतांनी सांगितले. काही मित्रपक्षांच्या जागांबाबत अखेरची चर्चा होणे बाकी आहे, ती लवकरच होईल. काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते मुंबईत आहेत, स्वतः उद्धव ठाकरे देखील रविवारच्या सभेसाठी जाणार आहेत, त्यामुळे मविआत सगळं ऑल इज वेल आहे, हे तुम्हाला कळलं पाहिजे, असंही ते म्हणाले.

- Advertisement -

राज्यात आणि देशात परिवर्तन आणणार

शनिवारी जाहीर झालेल्या निवडणुकांचे आम्ही स्वागत करतो. परिवर्तन आणायचे असेल तर निवडणुकांची अत्यंत आवश्यकता असल्याचे, राऊत म्हणाले. राज्यात आणि देशात परिवर्तन घडवून आणण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही या निवडणुकांना सामोरे जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. देशाचं स्वातंत्र्य, लोकशाही टिकवण्यासाठी परिवर्तन घडवून आणण्याचा चंग आम्ही बांधला आहे, त्यादृष्टीनेच आम्ही या निवडणुका लढणार असल्याचे ते म्हणाले.

हेही वाचा – Election Commission : मतदारांना आमीष देणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई, निवडणूक आयोगाचा इशारा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -