घरदेश-विदेशPM Modi : आम्हाला शिव्या देणे आणि व्होट बँकेचे राजकारण एवढा एकच...

PM Modi : आम्हाला शिव्या देणे आणि व्होट बँकेचे राजकारण एवढा एकच अजेंडा, मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

Subscribe

नवी दिल्ली : केंद्रीय निवडणूक आयोगाने आज, शनिवारी लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. यानिमित्ताने ट्वीट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे. आज विरोधकांकडे ना मुद्दा आहे ना दिशा. आम्हाला शिव्या देणे आणि व्होट बँकेचे राजकारण करणे, हा एकच अजेंडा त्यांचा शिल्लक आहे. त्यांची घराणेशाहीची मानसिकता आणि समाजात फूट पाडण्याचे कारस्थान जनता आता नाकारत आहे. त्यांच्या भ्रष्टाचाराच्या ट्रॅक रेकॉर्डमुळे त्यांना लोकांच्या नजरेला नजर मिळवणे कठीण झाले आहे. अशा लोकांना जनता कधीच स्वीकारणार नाही, असे पंतप्रधान मोदी यांनी सुनावले आहे.

हेही वाचा – Lok Sabha : सलग तिसऱ्यांदा मतदारांचा आशीर्वाद मिळेल, पंतप्रधान मोदींना विश्वास

- Advertisement -

तब्बल 140 कोटी देशवासीयांची ताकद आणि सामर्थ्याने आपला देश दररोज विकासाचे नवे विक्रम रचत आहे. आज आपण जगातील पाचव्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनलो आहोत आणि कोट्यवधी भारतीय गरीबीतून बाहेर आले आहेत. आमच्या सरकारच्या योजना देशाच्या कानाकोपऱ्यात आणि समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत पोहोचल्या आहेत. आम्ही 100 टक्के देशवासीयांपर्यंत पोहोचण्याचे काम केले आहे आणि त्याचे परिणाम आमच्यासमोर आहेत, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

आमच्या तिसऱ्या कार्यकाळात देशासाठी आम्हाला खूप काम करायचे आहे. अनेक दशके राज्य करणाऱ्यांनी निर्माण केलेली खोल दरी भरून काढण्यात आमची 10 वर्षे गेली. या 10 वर्षांत आपला भारतही समृद्ध आणि स्वावलंबी होऊ शकतो, असा आत्मविश्वास देशवासीयांमध्ये निर्माण झाला आहे. आमचा पुढील कार्यकाळ या संकल्पांच्या पूर्ततेचा मार्ग आणखी प्रशस्त करेल, असा दावा त्यांनी केला.

- Advertisement -

हेही वाचा – Lok Sabha Election 2024 : देशात 7, तर महाराष्ट्रात 5 टप्प्यांत मतदान; लोकसभा निवडणुकीचे बिगुल वाजले

भाजपाप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात गरिबी आणि भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा अधिक तीव्र होणार आहे. सामाजिक न्यायासाठी आम्ही अधिक प्रयत्न करू. आम्ही वेगाने भारताला जगातील तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनवू. तरुणांची स्वप्ने साकार करण्यासाठी आम्ही आणखी जोरदार प्रयत्न करत राहू. आगामी 5 वर्षे हा आपल्या सामूहिक संकल्पाचा काळ असेल; ज्यामध्ये आपण भारताच्या पुढील एक हजार वर्षांच्या विकास प्रवासाचा रोडमॅप तयार करणार आहोत, हे मला स्पष्टपणे दिसत आहे. हा काळ भारताचा सर्वांगीण विकास, सर्वसमावेशक समृद्धी आणि विश्वाच्या नेतृत्वाचा साक्षीदार असेल, असे मोदी यांनी म्हटले आहे.

मला माझ्या देशवासीयांच्या, विशेषत: गरीब, शेतकरी, तरुण आणि महिलाशक्तीच्या आशीर्वादाने मला अमर्यादित शक्ती मिळते. जेव्हा माझे देशवासी म्हणतात – “मी मोदींचे कुटुंब आहे”, तेव्हा ते मला विकसित भारताच्या उभारणीसाठी कठोर परिश्रम करण्यास प्रोत्साहन मिळते. विकसित भारतासाठी आम्ही सामूहिक प्रयत्न करू आणि हे लक्ष्य साध्य करू. हीच वेळ आहे, हीच योग्य वेळ आहे, असे त्यांनी नमूद केले आहे.

हेही वाचा – Election Commission : एकूण 97 कोटी नागरिक बजावणार मतदानाचा हक्क, 1.8 कोटी नवे मतदार

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -