घरमहाराष्ट्रपिंपरी चिंचवड येथे महिलेचा होरपळून मृत्यू

पिंपरी चिंचवड येथे महिलेचा होरपळून मृत्यू

Subscribe

पिंपरी - चिंचवड येथे गाडीने अचानक पेट घेतल्यामुळे एका महिलेचा होरपळून मृत्यू झाला. तर गाडीतील इतर तीन जण जखमी झाले आहेत.

पिंपरी – चिंचवड येथे एका महिलेचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संगीता होवाळे यांना उपचारासाठी खाजगी गाडीने घेऊन जात असताना गाडीने अचानक पेट घेतल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात संगीता होवाळे या महिलेचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर याच गाडीतून प्रवास करणारे इतर तीन जण बचावले असल्याने मोठी जीवितहानी टळली आहे.

नेमके काय घडले?

पिंपरी-चिंचवड येथे नखाते वस्तीत राहणाऱ्या कुटुंबातील महिला संगीता हिवाळे यांची रात्री अचानक तब्येत बिघडली. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी त्यांना काळेवाडी येथील रुग्णालयात उपचार करण्यासाठी नेण्यात आले होते. यावेळी गाडीत महिला रुग्णाची आई माया डॅनियल बोर्डे, भाऊ जॉन डॅनियल आणि मुलगा सायमन हिवाळे होते. काळेवाडी रुग्णालयात आणले असता त्या ठिकाणी तिच्यावर उपचार झाले नाही. अखेर त्यांना खासगी रुग्णालयात घेऊन जाण्यास सांगितले. यावेळी गाडीने दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये नेत असताना सर्व्हिस रोडवर पोहोचल्यानंतर अचानक त्यांच्या गाडीने पेट घेतला. पेट घेतल्यानंतर या गाडीतील आई, भाऊ आणि मुलगा गाडीच्या बाहेर पडले. मात्र संगीता यांना बाहेर पडता आले नाही. त्यामुळे तिचा आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.

- Advertisement -

या अपघातात हे झाले जखमी

या अपघातात आई माया डॅनियल बोर्डे, भाऊ जॉन डॅनियल आणि मुलगा सायमन हिवाळे हे या अपघातात जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संगीता हिवाळे या भोसरी मधील एका नामांकित कंपनीत काम करत होत्या तर मुलगा सायमन हा शिक्षण घेत आहे. भाऊ जॉन डॅनियल हा मोटरसायकलच्या गॅरेजवर काम करतो, अशी माहिती हिंजवडी पोलिसांनी दिली आहे. गाडीने पेट घेण्याचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याचे समोर आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -