घरमुंबईठाणे जिल्ह्यात 1 लाख 5 हजार 610 नवीन मतदार

ठाणे जिल्ह्यात 1 लाख 5 हजार 610 नवीन मतदार

Subscribe

ठाणे जिल्ह्याच्या 18 विधानसभा मतदारसंघात राबविण्यात आलेल्या मतदारयादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यामध्ये 1 लाख 5 हजार 610 नवीन मतदारांची नोंद करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिलेल्या माहितीनुसार नवीन मतदार नोंदणीत 31 ऑगस्ट अखेरपर्यंत मतदारांची संख्या 63 लाख 29 हजार 385 इतकी असल्याचे पत्रकार परिषदेत सांगितले.

विधानसभा निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने निवडणुकीसाठी ठाणे जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. त्यानुसार, मतदानाचा हक्क बजावताना मतदारांना कोणतीही अडचण होऊ नये तसेच, मतदारांना सुलभ मतदार केंद्रे उपलब्ध व्हावीत. यासाठी जिल्ह्यातील जी मतदान केंद्रे पहिल्या, दुसर्‍या, तिसर्‍या, मजल्यावर होती अशी सर्व मतदार केंद्रे तळमजल्यावर ठेवणार असल्याची माहिती जिल्हाधिकरी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिली.

- Advertisement -

ठाणे जिल्ह्यात एकूण 6621 मतदान केंद्रे असून लिफ्ट सुविधासह असलेली 251 मतदान केंद्रे वगळता 6370 मतदान केंद्रे तळमजजल्यावर असणार आहेत. यापैकी 5508 ही मतदान केंद्रे तळमजल्यावर तसेच 862 मतदान केंद्रे मंडपामध्ये असणार आहेत. लिफ्ट असलेल्या 251 मतदार केंद्रामध्ये बॅटरी बॅकअप व्यवस्था करण्यात येणार आहे. मतदार संख्या 1500 असतील अशाठिकाणी सहाय्यकारी मतदान केंद्रे असणार आहेत. त्यानुसार,133 सहाय्यकारी मतदानकेंद्रे असून जिल्ह्यात एकूण 6621 मतदान केंद्रे असणार आहेत.

मतदार राजासाठी टोल फ्री क्रमांक
विधानसभा निवडणूकीत प्रत्येक मतदाराने मतदानाचा हक्क बजवण्यासाठी आपले नाव मतदार यादीत असल्याची खातरजमा करुन घेणे आवश्यक आहे. त्यासाठी 1950 या टोल फ्री नंबरवर संपर्क साधून आपले नाव मतदार यादीत असल्याची खात्री करुन घ्यावी. तसेच, पूरग्रस्तांकडे मतदानासाठी आवश्यक असलेले पुरावे नष्ट झाले असल्यास पर्यायी उपाययोजना केली जाईल, असेही जिल्हाधिकार्‍यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -