घरताज्या घडामोडीकल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक सुरूच; २६८ नवे रुग्ण, तर २६४ मृत्यू

कल्याण-डोंबिवलीत कोरोनाचा उद्रेक सुरूच; २६८ नवे रुग्ण, तर २६४ मृत्यू

Subscribe

कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरू असून आज २६८ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज २६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. मुंबई, पुणे शहरापाठोपाठ आता कल्याण-डोंबिवली शहरात देखील कोरोनाने थैमान घातले आहे. कल्याण- डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचा कहर सुरू असून आज २६८ कोरोनाबाधित नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज २६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

१० हजार ४८ जण कोरोनामुक्त

कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रात आढळून आलेल्या बाधित रुग्णांपैकी आतापर्यंत १० हजार ४८ जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर सध्या ५ हजार ९१० रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

- Advertisement -

असे आढळले नवे रुग्ण

कल्याण (पू) : ४२
कल्याण (प): ६७
डोंबिवली (पू) : १०१
डोंबिवली (प) : ४७
मांडा-टिटवाळा : ०५
मोहना : ०५
पिसवली : ०१

- Advertisement -

हेही वाचा – Coronavirus Mumbai: मुंबईत आज ९९५ नव्या रुग्णांची नोंद; ६२ मृत्यू


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -