घरमुंबईदुर्गाडी पुलाच्या पूर्णत्वाच्या कामाला २०२० चा मुहूर्त!

दुर्गाडी पुलाच्या पूर्णत्वाच्या कामाला २०२० चा मुहूर्त!

Subscribe

नव्या दुर्गाडी पुलाच्या सहापैकी ३ मार्गीकेचे काम ३१ मे २०२० पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांची दिली आहे.

कल्याणहून मुंबई – ठाण्याला जाण्यासाठी दुर्गाडी पुलावरूनच जावे लागते. त्यामुळे वाहतुकीच्या दृष्टीने दुर्गाडी पूल सहापदरी करण्याचे काम मुंबई महानगर विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने हाती घेतले आहे. त्या कामाची पाहणी करण्यासाठी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी गुरूवारी कल्याणचा दौरा केला. नव्या दुर्गाडी पुलाच्या सहापैकी ३ मार्गीकेचे काम ३१ मे २०२० पर्यंत पूर्ण होईल, अशी माहिती एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता जयवंत ढोणे यांनी दिली आहे. त्यामुळे नवीन वर्षात दुर्गाडी पुलाच्या पूर्णत्वाच्या कामाला २०२० चा मुहूर्त निघाला आहे.

एमएमआरडीए अधिकाऱ्यांची माहिती

कल्याणकरांच्या दृष्टीने वाहतूकीसाठी दुर्गाडी पूल हा अत्यंत महत्वाचा समजला जात आहे. ठाणे मुंबईला जाण्यासाठी याच पूलाचा वापर केला जातो. त्यामुळे दररोज पूलावरून हजारो वाहनांची वर्दळ असते. दुर्गाडी पुलाचे सहा मार्गिकेचे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या हजारो लोकांना दररोज तासनतास वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वाढत्या वाहतूक केांडीमुळे वाहन चालक कमालीचे हैराण झाले आहेत. दुर्गाडी पूलावरील वाहतूक कोंडीची झळ शहरातंर्गत असलेली सहजानंद चौक, आधारवाडी चौकापर्यंत सोसावी लागत आहे. मागील तीन महिन्यांपासून पुलाचे काम रखडले होते. त्यामुळे वाहनचालकांच्या हालात अधिकच भर पडत होती. त्यामुळे स्थानिक आमदार विश्वनाथ भोईर यांनी दुर्गाडी पुलाचे काम तातडीने पूर्ण करण्याची मागणी एमएमआरडीएकडे केली होती. त्याच पार्श्वभूमीवर गुरूवारी एमएमआरडीए अधिकाऱ्यांनी दुर्गाडी पुलाला भेट देऊन पाहणी दौरा केला. यावर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे तीन महिने पुलाचे काम मागे पडले. पंरतु आता युध्दपातळीवर कामाला सुरूवात झाली असून, डिसेंबर २०२० पर्यंत पुलाचे काम पूर्ण करण्याचा मानस असून तत्पुर्वी ३१ मे २०२० पर्यंत या किमान ३ मार्गिका तरी सुरू करण्यासाठी आमचा प्रयत्न असेल, असे एमएमआरडीएचे कार्यकारी अभियंता ढाणे यांनी सांगितले. या पाहणी दौऱ्यात आमदार विश्वनाथ भोईर, सभागृह नेते श्रेयस समेळ, शिवसेनेचे उपशहरप्रमुख रवी पाटील, नगरसवेक सचिन बासरे, सुधीर बासरे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.

- Advertisement -

हेही वाचा – विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तात्पुरता खातेवाटप जाहीर


- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -