घरमुंबईएसीपी अलकनुरे आणि सचिन वाझे एनआयए कार्यालयात दाखल

एसीपी अलकनुरे आणि सचिन वाझे एनआयए कार्यालयात दाखल

Subscribe

मनसूख हिरेन मृत्यू प्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात अडकलेले मुंबई पोलीस दलातील अधिकारी सचिन वाझे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. यातच आज (शनिवारी) गुन्हे शाखेचे सहायक पोलिस आयुक्त नितीन अलकनुरे आणि सचिन वाझे एकत्र एनआयए कार्यालयात दाखल झाले आहेत. उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील अँटिलिया निवासस्थानाजवळ जिलेटिन स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ कार सापडली होती. या घटनेनंतर कारचा मालक मनसूख हिरेनची पोलिसांकडून चौकशी सुरु होती मात्र चौकशी सुरु असतानाच हिरेन यांचा मृतदेह पोलिसांना सापडला होता. यावरुन विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना पदावरून हटवण्यात आले. सचिन वाझे यांच्याकडून स्फोटके प्रकरणाचा तपास काढून घेतल्यानंतर गुन्हे शाखेचे एसीपी नितीन अलकनुरे यांच्याकडे सोपविण्यात आला होता.

- Advertisement -

हेही वाचा- सचिन वाझे यांच्या अटकेची शक्यता, वाझेंच्या स्टेट्सने उडवली खळबळ

यानंतर अलकनुरे हे अंबानी स्फोटके प्रकरणाचा वाझे यांच्यानंतर तपास अधिकारी म्हणून काम पहात होते. दरम्यान आता या प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपावण्यात आला आहे. यातच आज संशयित आरोपी म्हणून सचिन वाझे जबाब नोंदवण्यासाठी एनआयए कार्यालयात दाखल झाले आहे. गेल्या तासभरापासून वाझेंची चौकशी सुरु आहे. सचिन वाझे यांची एनआयए कार्यालयात चौकशी सुरू असतानाच अलकनुरे हे देखील एनआयए कार्यालयात दाखल झाले आहे. अलकनुरे यांच्याकडून स्फोटकांची स्कॉर्पिओ आढळून आल्यापासून नेमका तपास कसा सुरू झाला होता हे एनआयए जाणून घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाझे यांच्याकडून तपास काढून घेतल्यानंतर एसीपी नितीन अलकनुरे तपास करत होते त्यानंतर हा तपास एनआयए कडे वर्ग करण्यात आला मात्र आधीचा घटनाक्रम एनआयए जाणून घेण्याची माहिती आहे.

- Advertisement -

सचिन वाझेंचे खळबळजनक व्हॉट्सॲप स्टेटस

मनसूख हिरेन मृत्यू प्रकरणानंतर तपास अधिकारी असलेले वाझे तणावात असल्याचे त्यांच्या व्हॉट्सॲप स्टेट्सवरुन समोर येत आहे. वेळ आलीय जगाचा निरोप घेण्याची असे धक्कादायक स्टेट्स वाझेंना ठेवले आहे. त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे. ”3 मार्च 2004 रोजी सीआयडीतील माझ्या सहकारी अधिकाऱ्यांनी मला खोट्या प्रकरणात अटक केली. ती केस अजूनही न्यायप्रविष्ठ आहे. मात्र आता पुन्हा इतिहासाची पुनरावृत्ती होत आहे. माझे सहकारी अधिकारी आता पुन्हा मला चुकीच्या पद्धतीने अडकवण्यासाठी सापळा रचत आहेत. तेव्हाच्या घटनेत आणि आताच्या घटनेत थोडा फरक आहे. त्यावेळी माझ्याकडे संयम, आशा, आयुष्य आणि सेवेची 17 वर्ष होती. आता मात्र माझ्याकडे ना आयुष्याची 17 वर्ष आहेत, ना सेवेची. ना जगण्याची आशा. जगाचा निरोप घेण्याची वेळ आता जवळ आली.” असे धक्कादायक स्टेटस सचिन वाझेंनी आपल्याला व्हॉट्सअॅपला ठेवले आहे.


हेही वाचा- जगाचा निरोप घेण्याची वेळ आलीय, सचिन वाझेंचे धक्कादायक WhatsApp स्टेटस

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -