घरताज्या घडामोडीRain LIVE Update: समुद्राला भरती; मरिन ड्राईव्हवर उंचच उंच लाटा!

Rain LIVE Update: समुद्राला भरती; मरिन ड्राईव्हवर उंचच उंच लाटा!

Subscribe

मुंबईसह ठाणे शहर, ग्रामीण भागासह कल्याण, डोंबिवली, मुरबाड, उल्हासनगर, टिटवाळा, भिवंडी, शहापूर भागाला बुधवारी मुसळधार पावसाने झोडपले.

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून पाऊस सुरु आहे. समुद्राला भरती आली असून मरिन ड्राईव्हवर उंचच उंच लाटा उसळत आहेत. मरिन ड्राईव्हवर परिसरातही सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळतोय..मरीन ड्राईव्ह समुद्रातील पाण्याला आलेल्या भरतीमुळे उंचच उंच लाटांचे हे दृश्य धडकी भरवणारे आहे.

- Advertisement -

पेडर रोड येथे भूस्खलन

बुधवारी मुंबईत अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडल्याच्या घटना समोर आल्या आहेत. दरम्यान, पेडर रोड येथे भूस्खलन झाल्याची घटना घडली आहे. बुधवारी रात्री पेडर रोड येथे जमीन खचली असून परिस्थिती पूर्ववत करण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. तसेच याठिकाणी एक दोन नाही तर ५० झाडे उन्मळून पडली आहेत. (सविस्तर वाचा)


मुंबईतील हँगिंग गार्डन परिसरात मुसळधार पावसाने झाडे कोलमडून रस्त्यावर पडली तर रस्त्याला पडल्या भेगाचे दृश्य…

- Advertisement -


मंत्रालय परिसरात पहिल्यांदा पाणी साचल्याचं बघतोय – शरद पवार

मंत्रालय परिसरात पहिल्यांदा पाणी साचल्याचं बघतोय – शरद पवार

मंत्रालय परिसरात पाणी साचल्यानंतर गाडीतून जात असताना खासदार शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा संवाद… नक्की ऐका. #MumbaiRains #MumbaiFloods

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Wednesday, August 5, 2020


मुंबई शहरात मुसळधार पावसामुळे वडाळा येथे रस्त्यावर पाणीच पाणी


बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त पहाणीसाठी पुन्हा फिल्डवर

मुंबईच काय जगातील कोणतेही शहर तुंबणारच; आयुक्तांचा दावा

‘दोन दिवस पावसाने अक्षरश: मुंबईला झोडपून काढले आहे. तर मुंबईत बुधवारी चार तासात ३०० मिमी विक्रमी पाऊस पडला आहे. गेल्या ३० वर्षात मी असा पाऊस कधीच पाहिला नाही. एवढ्या मोठ्या प्रमाणावर पाऊस झाल्याने मुंबईचे काय जगातील कोणतेही शहर तुंबणारच’, असा दावा मुंबई महापालिकेचे पालिका आयुक्त  आय.एस.चहल यांनी केला आहे. तसेच ते पुढे म्हणाले आहे की, मुंबईतील काही भागांत काल एकप्रकारचे वादळत आले होते. (सविस्तर वाचा)


ठाण्यात आज मुसळधार पावसासह ढगाळ वातावरण राहिल असा अंदाज भारतीय हवामान खात्याने वर्तविला आहे. ठाण्यातील उपवन तलाव आणि वंदना सिनेमा जवळचे काही दृश्य


मुंबईच्या कुलाबा भागात गेल्या २४ तासात ३३१.८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. तर आज ४.३३ मीटर्सची भरती अपेक्षित: भारत हवामान विभाग


मुंबई शहर व उपनगरामध्ये पुढील ३ ते ४ तासांत मध्यम ते मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. काही भागात मेघगर्जनेसह वीज पडण्याची शक्यता: भारत हवामान विभाग


काल मुंबई शहरात मुसळधार पाऊस पडल्याने मुंबईच्या नायर रुग्णालयात पूर


मुंबईतील एन.एस. पाटकर मार्गावरील ridge road च्या तटबंदीचा काही भाग कोसळला.


पालिकेच्या ‘डी’ विभागात सर्वाधिक पाऊस

बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात आज यंदाच्या मोसमातील १२ तासातील सर्वाधिक पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामध्ये शहर परिसरात २१५.८ मिलीमीटर, पूर्व उपनगरांमध्ये १०१.९ मिलीमिटर तर पश्चिम उपनगरांमध्ये ७६.०३ मिलीमीटर पाऊस नोंदविण्यात आला आहे. यामध्ये सर्वाधिक‌ म्हणजे ३०९ मिलीमीटर पाऊस महापालिकेच्या ‘डी’ विभाग परिसरात नोंदविण्यात आला आहे.  (सविस्तर वाचा)


मुंबईकरांसाठी खुशखबर! 

बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणीपुरवठा करणा-या आणि बृहन्‍मुंबई महापालिका क्षेत्रातच असणा-या दोन तलावांपैकी महानगरपालिकेचा ‘विहार तलाव’ दिनांक ०५ ऑगस्‍ट २०२० रोजी रात्री १०.०० वाजताच्या सुमारास पूर्ण भरुन वाहू लागला आहे. २७,६९८ दशलक्ष लीटर उपयुक्‍त जलधारण क्षमता असणारा हा तलाव गतवर्षी दिनांक ३१ जुलै, २०१९ रोजी ओसंडून वाहू लागला होता. तर त्‍या आधीच्‍या वर्षी म्‍हणजेच वर्ष २०१८ मध्‍ये दिनांक १६ जुलै रोजी विहार तलाव ओसंडून वाहू लागला होता. (सविस्तर वाचा)

मुंबईला पाणी पुरवठा करणारा विहार तलाव ओसंडून वाहू लागला

Posted by आपलं महानगर – My Mahanagar on Wednesday, August 5, 2020


पुढील ३ तासांत मुंबईत काही ठिकाणी वाऱ्यासह जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यताः भारत हवामान विभाग


मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सलग दुसऱ्या मुसळधार पाऊस सुरुच आहे. पालघर जिल्ह्याला पावसाने झोडपून काढलं असून कोकणातही दमदार पाऊस सुरु आहे. याशिवाय कोल्हापुरातही पावसाचा जोर वाढला आहे. तर सोमवारी मध्यरात्रीपासून रिपरिप सुरू असलेल्या पावसाने बुधवारी मुंबई, ठाणे परिसराला झोडपले. पावसासह वाऱ्याचा वेग असल्याने मुंबई, ठाणे, पालघरमध्ये अनेक ठिकाणी पडझड झाली असून, सखल भाग जलमय झाले.


मुंबई सेंट्रल परिसरातील नवजीवन परिसरात साचलेले पाणी पूर्णत: ओसरले असून तेथील रस्ते वाहतूक सुरळीत सुरु आहे. त्याची सद्यस्थिती दर्शविणारे हे छायाचित्र..


मुंबई: हिंदमाता येथील साचलेले पाणी पूर्णत: ओसरले असून तेथील रस्ते वाहतूक सुरळीत सुरु आहे. त्याची सद्यस्थिती दर्शविणारे हे छायाचित्र..


मुंबईची दाणादाण

मुंबईसह उपनगरात मुसळधार पावसाने अनेक भागात साचले होते. बुधवारी सोसाट्याच्या वाऱ्याने वृक्ष उन्मळून पडल्याने रस्त्यावरील वाहतूक अन्य मार्गाने वळवावी लागली होती. तर रेल्वे मार्ग पाण्याखाली गेल्याने अत्यावश्यक सेवेतील अनेक कर्मचारी रेल्वे गाडय़ांमध्ये अडकून पडल्याचे बघायला मिळाले. रेल्वे सेवाही कोलमडली. शहर आणि पूर्व उपनगरांच्या तुलनेत पश्चिम उपनगरात सकाळपासून पावसाचा जोर कमी होता. मात्र सायंकाळी पश्चिम उपनगरांमध्येही पावसाने जोर धरल्याने मुंबईकरांची चांगलीच दाणादाण झाल्याचे पाहायला मिळाले.


ठाणे जिल्हा, ग्रामीण भागाला पावसाने झोडपले

ठाणे शहर, ग्रामीण भागासह कल्याण, डोंबिवली, मुरबाड, उल्हासनगर, टिटवाळा, भिवंडी, शहापूर भागाला बुधवारी मुसळधार पावसाने झोडपले. पावसामुळे कल्याण-मुरबाड रस्ता पाण्याखाली गेला. तसेच वालधुनी, कामवारी, उल्हास नदीच्या पाणीपातळीच झपाट्याने वाढ झाली. पावसासह सोसाट्याच्या वा-यामुळे बदलापूर, वांगणी तसेच ठाणे ग्रामीण भागात ठिकठिकाणी झाडे कोसळली. नवी मुंबईतही अनेक ठिकाणी झाडे कोसळली. वीज खांबाच्या तारा तुटल्याने ठाणे तालुक्यातील बदलापूर, टिटवाळा, नवी मुंबई अशा बहुतेक भागातील वीज पुरवठा खंडीत झाला होता. (सविस्तर वाचा)


ऑगस्ट महिन्यातील गेल्या ४६ वर्षांचा विक्रम पावसाने मोडला

मुसळधार पावसाने मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले असून अनेक ठिकाणी ट्रेन आणि गाड्याही अडकल्याचे पाहायला मिळाले. मुसळधार पावसामुळे एनडीआरएफ आणि आरपीएफच्या जवानदेखील या बचावकार्यात सहभागी होऊन मदतीस उतरले होते. दरम्यान, मुंबईतील कुलाबा परिसरात ऑगस्ट महिन्यातील गेल्या ४६ वर्षांचा पावसाचा विक्रम मोडल्याचे सांगितले जात आहे. (सविस्तर वाचा)


दिवसभरात पावसाचा जोर होणार कमी

Mumbai Rainfall updates at ५.३० am

सांताक्रूझ १४६. १ मिमी तर कोलाबा ३३० मिमी पावसाची नोंद करण्यात आली आहे. पालघरच्या अनेक भागात ढगाळ वातावरण राहिल. तर मुंबई, ठाण्यात जास्त ढगाळ वातावरण राहणार नाही. दरम्यान  रात्री पावसाचा जोर कमी झाल्याने दिवसभरात मुसळधार पाऊस कोसळण्याची शक्यता नाही असे सांगण्यात आले आहे.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -