घरताज्या घडामोडीविधानसभा अध्यक्षाची निवडणूक लांबणीवर

विधानसभा अध्यक्षाची निवडणूक लांबणीवर

Subscribe

आघाडीच्या दहा आमदारांना कोरोना झाल्याने ते अधिवेशनाला उपस्थित नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे कोणतीही जोखीम नको म्हणून विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक तूर्तास न घेण्याचा निर्णय सत्ताधारी पक्षाने घेतला.

महाराष्ट्र विकास आघाडीच्या दहा आमदारांना कोरोनाची लागण झाल्याने आघाडीने विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नव्या अध्यक्ष निवडीसाठी पुढील अधिवेशनाची वाट पहावी लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष पदासाठी बुधवारी निवडणूक घेण्याचे आघाडीने निश्चित केले होते. त्यादृष्टीने आघाडीच्या आमदारांना सभागृहात उपस्थित राहण्यासाठी व्हीप बजावण्यात आला होता. आघाडीच्या दहा आमदारांना कोरोना झाल्याने ते अधिवेशनाला उपस्थित नसल्याची माहिती समोर आली. त्यामुळे कोणतीही जोखीम नको म्हणून विधानसभा अध्यक्ष पदाची निवडणूक तूर्तास न घेण्याचा निर्णय सत्ताधारी पक्षाने घेतला.

दरम्यान, विधानसभा अध्यक्षांची निवड याच अधिवेशनात व्हावी असा काँग्रेसचा आग्रह होता. मात्र ही निवडणूक पुढे ढकलल्याने आता अध्यक्ष निवडीसाठी एक दिवसाचे विशेष अधिवेशन बोलवावे, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

- Advertisement -

प्रदेशाध्यक्षपदी निवड होण्यापूर्वी म्हणजे ४ फेब्रुवारीला नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला . तेव्हापासून हे पद रिक्त आहे. सध्या उपाध्यक्ष नरहरी झिरवळ हेच विधानसभेचे कामकाज पाहत आहेत. दरम्यान,विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे कायम राहणार असल्याने या पदासाठी पुणे जिल्ह्यातील भोरचे आमदार संग्राम थोपटे यांचे नाव सध्याआघाडीवर आहे.


हेही वाचा – तारेवरची कसरत! राज्याचा अर्थसंकल्प १० हजार कोटींच्या तुटीचा

 

- Advertisement -

 

 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -