घरमुंबईबेस्ट कर्मचारी संप: खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्याची मुभा

बेस्ट कर्मचारी संप: खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्याची मुभा

Subscribe

बेस्टच्या संपामुळे मुंबईकराची गैरसोय होऊ नये तसंच प्रवासी वाहतूक सुरक्षीत ठेवण्यासाठी शासनाने खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्याची मुभा दिली आहे.

बेस्ट कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपामुळे मुंबईकरांचे हाल होत आहे. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाचा आज दुसरा दिवस आहे त्यामुळे आज ही मुंबईकरांना कामावर वेळेवर पोहचता आले नाही. बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे रिक्षा आणि टॅक्सी चालकांची चांदी झाली आहे. प्रवाशांकडून रिक्षा आणि टॅक्सीचालक अव्वाच्या सव्वा भाडे आकारत आहे. बेस्टच्या संपामुळे मुंबईकराची गैरसोय होऊ नये तसंच प्रवासी वाहतूक सुरक्षीत ठेवण्यासाठी शासनाने खासगी वाहनांना प्रवासी वाहतूक करण्याची मुभा दिली आहे.

शासनाने काढले परिपत्रक

प्रवाशांची गैरसोय होणार नाही

महाराष्ट्र शासनाद्वारे मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व खासगी प्रवासी बसेस, स्कूल बसेस, कंपन्यांच्या मालकीच्या बसेस आणि मालवाहू वाहन यांना प्रवासी वाहतूक करण्यास मान्यता दिली आहे. राज्यपाल सी विद्यासागर राव यांनी एक परिपत्रक काढून हे आदेश जारी केले आहेत. बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे घेतल्यानंतर शासनाने दिलेली अधिसूचना रद्द होईल असे या पत्रकात म्हटले आहे.

- Advertisement -

एसटी मुंबईकरांच्या मदतीला

बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपामुळे मुंबईकरांचे हाल होत आहे. याच पार्श्वभूमीवर आज दुसऱ्या दिवशी देखील मुंबईकरांची गैरसोय टाळण्यासाठी एसटी मुंबईकरांच्या मदतीला धावली आहे. एसटी महामंडळाकडून ७६ बसेस मुंबईत धावत आहेत.

कुर्ला पूर्व ते माहूल – ८ बस

- Advertisement -

कुर्ला पश्चिम ते बांद्रा – ८ बस

घाटकोपर ते माहूल – ३ बस

पनवेल ते मंत्रालय – ५ बस

सीएसटी ते मंत्रालय – १० बस

सीएसटी ते कुलाबा – १० बस

कुर्ला पश्चिम ते सांताक्रूझ – ५ बस

अंधेरी पूर्व ते स्पेस – ५ बस

दादर ते मंत्रालय – ५ बस

बोरवली ते सायन – २ बस

ठाणे ते मंत्रालय – १५ बस

हेही वाचा – 

बेस्ट संपाने मुंबईकरांचे हाल

बेस्ट कर्मचारी संप चिघळला; कामावर हजर व्हा अन्यथा घरं सोडा

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -