घरमहाराष्ट्रपुण्यात स्कुल बस उलटून अपघात; विद्यार्थी जखमी

पुण्यात स्कुल बस उलटून अपघात; विद्यार्थी जखमी

Subscribe

पुण्यातील पोद्दार शाळेची बस उलटून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमध्ये विद्यार्थी किरकोळ जखमी झाले आहेत.

अपघाताच्या घटनामध्ये वाढ होत असताना पुन्हा एकदा पुण्यात बसचे चाक दुभाजकावर चढल्यामुळे स्कुल बसला अपघात झाल्याची घटना घडली आहे. पुण्यातील कात्रज परिसरात असलेल्या पोद्दार शाळेची बस उलटून हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. ही घटना बुधवारी दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास घडली असून या घटनेमध्ये विद्यार्थ्यांना किरकोळ मार लागला आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांवर पोद्दार शाळेतच प्राथमिक उपचार करण्यात आले आहेत. याप्रकरणाची भारती विद्यापीठ पोलिसांनी नोंद केली आहे.

नेमके काय घडले?

अपघातस्थळी दाखल झालेल्या भारती विद्यापीठ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे बंगळूर मार्गावर असलेल्या कात्रज परिसरात असलेल्या पोद्दार हायस्कुलची बस क्रमांक १५ ही बस बुधवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घेऊन निघाली होती. दरम्यान, शाळेच्या येथून वळण घेत असताना हा अपघात झाला आहे. बसचे एक चाक दुभाजकावर चढल्यामुळे बस उलटून हा अपघात झाल्याचे समोर आले आहे. बस उलटल्याचे कळताच शाळेचे कर्मचारी, शिक्षक आणि आजूबाजूच्या लोकांनी बस मधून विद्यार्थ्यांना प्रथम बाहेर काढले. या अपघातात ६ ते ७ विद्यार्थ्यांना किरकोळ खरचटले असून जखमी विद्यार्थ्यांवर शाळेतील प्राथमिक आरोग्य विभागात उपचार करण्यात आलेले आहे. या अपघाताची माहिती मिळताच पालकांनी शाळेकडे धाव घेतली असून शाळा प्रशासनाने विध्यार्थ्यांना पालकांकडे सुपूर्द केले आहे. भारती विद्यापीठ पोलिसांनी अपघाताची नोंद केली असून या अपघातात दोषी असणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.

- Advertisement -

वाचा – पुण्यातील अपघातात २ ठार, २ जखमी


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -