घरनवी मुंबईकोरोना काळातील खर्चाचे ऑडिट रोखण्यासाठी कॅगला पालिकेकडून नोटीस

कोरोना काळातील खर्चाचे ऑडिट रोखण्यासाठी कॅगला पालिकेकडून नोटीस

Subscribe

कॅगने, कोरोना काळात झालेला खर्च, रस्ते कामांत घोटाळा, पुलांच्या कामांत घोटाळा, दहिसर येथे अजमेरा बिल्डरच्या भूखंडाची खरेदी, सहा सांडपाणी प्रकल्पांवर खर्च अशा एकूण १२ हजार कोटींच्या कामांची चौकशी करायला सुरुवात केल्याने कॅगला या चौकशीपासून रोखण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शक्कल लढवली.

मुंबईः मुंबई महापालिकेने कोरोनाला नियंत्रणात आणण्यासाठी कोरोना कालावधीत तब्बल पाच हजार कोटी रुपये खर्चून रूग्णालय उभारणी, औषधे, साधनसामग्री खरेदी केली. त्याची चौकशी करणाऱ्या ‘कॅग’ला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने नोटीस बजावली आहे. साथरोग नियंत्रण कायद्याअंतर्गत कोरोना कालावधीत पालिकेने केलेल्या खर्चाचे साथरोग कायद्याच्या अंतर्गत कॅगकडून ऑडिट होऊ शकत नाही, असे पालिकेने ठणकावून सांगितले आहे.

राज्यात काही महिन्यांपूर्वी शिवसेनेचे नेते व आताचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी करून ४० आमदारांना आपल्या सोबत घेऊन भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी हातमिळवणी करून राजकीय भूकंप घडवला. त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार पाडले. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. त्यानंतर राज्याच्या मुख्यमंत्री पदी एकनाथ शिंदे तर उप मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस हे विराजमान झाले. तेव्हापासून मुंबई महापालिकेतील विकासकामांबाबत, कोरोना कालावधीतील पाच हजार कोटी रुपयांच्या खर्चाबाबत भ्रष्टाचाराचे जोरदार आरोप भाजप व शिंदे गटाकडून होऊ लागले. चौकशीची मागणी होऊ लागली.

- Advertisement -

त्यामुळेच मुंबई महापालिकेच्या खर्चाचे ऑडिट करण्यासाठी कॅगचे पथक काहो दिवसांपूर्वी दाखल झाले व चौकशीच्या कामाला लागले. मात्र त्यामुळे पालिकेतील संबंधित अधिकाऱ्यांसाज धाबे दणाणले. कॅगने, कोरोना काळात झालेला खर्च, रस्ते कामांत घोटाळा, पुलांच्या कामांत घोटाळा, दहिसर येथे अजमेरा बिल्डरच्या भूखंडाची खरेदी, सहा सांडपाणी प्रकल्पांवर खर्च अशा एकूण १२ हजार कोटींच्या कामांची चौकशी करायला सुरुवात केल्याने कॅगला या चौकशीपासून रोखण्यासाठी पालिकेच्या अधिकाऱ्यांनी शक्कल लढवली.
मुंबईत मार्च २०२० पासून कोरोनाचा संसर्ग सुरू झाला होता. या कोरोना कालावधीत मुंबईत आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाली होती. या कोरोनाला रोखण्यासाठी पालिकेने युद्धपातळीवर यंत्रणा उभारली, मोठ्या प्रमाणात औषधे खरेदी केली. मात्र साथरोग नियंत्रण कायदा १८९७ अंतर्गत सदर खर्चाचे ऑडिट होऊ शकत नाही, असे पालिका आयुक्त व प्रशासकीय अधिकारी डॉ इकबाल चहल यांनी स्पष्ट केले असून साथरोग नियंत्रण कायद्याअंतर्गत कॅगला नोटीस बजावून तसे कळविण्यात आले आहे.

खालील खर्चाचे ऑडिट

- Advertisement -

घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पांवरील खर्च – १०२०.४८ कोटी रुपये

तीन रुग्णालयांत करण्यात आलेली औषध, यंत्र सामग्री खरेदी -: ९०४.८४ कोटी रुपये

मुंबईतील ५६ रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी २२८६.२४ कोटींचा खर्च

चार पुलांच्या बांधकामावरील खर्च १,४९६.०० कोटी रुपये

तीन मलनि:सारण प्रक्रिया केंद्रासाठी ११८७.३६ कोटींचा खर्च

दहिसर येथे अजमेरा बिल्डरच्या भूखंडाची खरेदी – ३३९.१४ कोटी रुपये

सहा सांडपाणी प्रकल्पांवर खर्च – १०८४.६१ कोटी रुपये

Amar Mohite
Amar Mohitehttps://www.mymahanagar.com/author/amar-mohite/
गेली १७ वर्षे पत्रकारितेत कार्यरत, न्यायालयीन निकाल आणि सुनावणीवर लिहिण्याची आवड
- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -