घरमुंबईमालाडमधील बोर्गेस हाऊसची संरक्षक भिंत कोसळली

मालाडमधील बोर्गेस हाऊसची संरक्षक भिंत कोसळली

Subscribe

मालाडमधील बोर्गेस हाऊसची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

मालाडमध्ये पुन्हा एकदा संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली आहे. मालाडमधील बोर्गेस हाऊसची संरक्षक भिंत कोसळल्याची घटना घडली असून या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनास्थळी अग्निशमन दल, पोलीस आणि महापालिका दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. याआधी देखील मुसळधार पावसामुळे सोमवारी रात्री मालाडमध्ये संरक्षण भिंत कोसळल्याची धक्कादायक घटना घडली होती. या दुर्घटनेत २१ जणांचा हकनाक बळी गेला होता. त्याचबरोबर पुण्याच्या कोंडवा परिसरातही इमारतीची संरक्षण भिंत कोसळून १५ जणांचा बळी गेला होता. तर सोमवारी मध्यरात्री कल्याणच्या नॅशनल उर्दू शाळेची संरक्षण भिंत कोसळल्याची घटना घडली होती. या दुर्घटनेतही ३ जणांचा मृत्यू झाला होता.

मालाडच्या आंबेडकरनगर आणि पिंपरीपाडात कोसळली भिंत

रात्रीच्या सुमारास अचानक भिंत झोपड्यांवर कोसळल्याने या परिसरात राहणाऱ्या रहिवाशांना नेमकं काय करावंकुठे पळावंहे सूचतंच नव्हतंत्यातून अनेकांना आपला जीव गमवावा लागलाया घटनेत लहान मुलांचाही हकनाक मृत्यू झालाघटना घडल्यानंतर तात्काळ बचावकार्य सुरू केलं गेलंएनडीआरएफचे जवानअग्निशमन दलाचे जवानपोलीस प्रशासन आणि स्थानिक रहिवासी लोकांचं शोधकार्य करत होतेमंगळवारी दिवसभर अशीच परिस्थिती होतीबुधवारी जवानांकडून शोधकार्य थांबवलं गेलंपणस्थानिक लोक आपलं कोणी जमिनीखाली अडकलं आहे यासाठी स्वतच शोधकार्य करत होतेत्यामुळे स्थानिकांमध्येही नाराजी होती.

- Advertisement -

या घटनेत अनेकांनी आपले नातेवाईक गमावलेतरआंबेडकर नगर परिसरातील अनेक झोपड्यांचं नुकसान झालंस्थानिक जमिनीखाली आपला संसार शोधत होतेही परिस्थिती आजही कायम आहेकारणया परिसरातील दोनशेहून अधिक झोपड्या पाण्याखाली वाहून गेल्या आहेतपुन्हा संसार कसा उभारावा आणि कुठून सुरुवात करायची असा प्रश्न इथल्या नागरिकांना पडला आहेत्यामुळेसरकारने आमच्याकडे लक्ष द्यावेअशी मागणी नागरिक करतातसद्यपरिस्थितीत जखमींवर मुंबईतील शताब्दी हॉस्पिटलकूपर हॉस्पिटलकेईएमव्ही.एस.देसाई या हॉस्पिटल्समध्ये उपचार सुरू आहेतत्यातील अनेकांची प्रकृती गंभीर आहे.


हेही वाचा – मालाड भिंत घटना – दहावीतल्या सुमीतला हाता-पायाला फ्रॅक्चर

- Advertisement -

हेही वाचा – मालाड दुर्घटना : मुख्यमंत्र्यांची मदत पोहोचणार कधी? स्थानिक हवालदील!


 

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -