घरमुंबईबॉस इज ऑलवेज राईट

बॉस इज ऑलवेज राईट

Subscribe

पवारांच्या भूमिकेचे सुप्रिया सुळेंकडून विश्लेषण

सुप्रिया सुळेंनी शरद पवार आणि नरेंद्र मोदींच्या भेटीचे विश्लेषण केले आहे. महाराष्ट्रातील राजकारणात आमचे वैयक्तिक संबंध अतिशय चांगले असतात. भलेही आमच्या विचारात काही प्रमाणात अंतर असेल, पण आमचे वैयक्तिक संबंध चांगले राहिले आहेत. त्यामुळे आम्ही शिवसेनेसोबत जाण्याचा निर्णय घेतला. पवारसाहेब माझे केवळ वडील नाहीत, तर माझे बॉसही आहेत. नोकरी टिकवायची असेल तर, बॉस इज ऑलवेज राईट… असे म्हणत शरद पवारांचा शब्द आमच्यासाठी अंतिम असल्याचे खासदार सुप्रिया सुळेंनी म्हटले आहे. तर अजित पवार यांनी भाजपला समर्थन देत पुन्हा स्वगृही परतण्यासंबंधी विचारले असता सुप्रिया सुळे यांनी सांगितले की, अजित पवारांसंबंधी पक्ष निर्णय घेईल. ते आधी माझे मोठे बंधू आहेत. मला पाच मोठे भाऊ आहेत. आम्ही एकत्र कुटुंब आहोत, असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

मोदींनी दिलेल्या ऑफरसंदर्भात बोलताना, मी बैठकीला नव्हते म्हणून यावर मी बोलणे उचित नाही. पण, मोदींनी ऑफर दिली असेल तर तो मोदींचा मोठेपणाच होता. मात्र, तरीही शरद पवारांना विनम्रतेने ती ऑफर नाकारली, हेही त्यांचा आदरभाव होता, असे म्हणत पवार-मोदी भेटीवरील चर्चेवर सुप्रिया सुळेंनी भाष्य केले आहे. आमची सर्वात मोठी लढाई भाजपाविरुद्धच होती. निवडणूक काळातही दोन्ही पक्षांनी टोकाची भूमिका घेतली. त्यामुळे भाजपासोबत जाण्याचा प्रश्न नव्हता, असे म्हणत भाजपला पाठिंबा देण्यास आम्ही तयार नसल्याचे सुप्रिया सुळेंनी स्पष्ट केले.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -