Eco friendly bappa Competition
घर ताज्या घडामोडी माझ्या राजकीय जीवनातला... ठाण्यातील क्लस्टरच्या कामावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

माझ्या राजकीय जीवनातला… ठाण्यातील क्लस्टरच्या कामावर मुख्यमंत्री शिंदेंची प्रतिक्रिया

Subscribe

राज्यातील उद्योगांसंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची MSMची बैठक पार पडली. या बैठकीनंतर एकनाथ शिंदे यांनी MSM आणि ठाण्यातील क्लस्टरच्या कामाबाबत प्रतिक्रिया दिली आहे. माझ्या राजकीय जीवनातला हा महत्त्वाचा असा प्रकल्प आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

माझ्या राजकीय जीवनातला महत्त्वाचा प्रकल्प

ठाण्यात क्लस्टरचं उद्घाटन होतं आहे. यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, ठाणेच नाही तर संपूर्ण MMR क्षेत्रात लाखो लोक धोकादायक इमारतीमध्ये राहत आहेत. त्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या अशा क्ल्स्टरच्या विकास योजनेला मुहूर्त स्वरूप आलंय. पहिल्या क्लस्टरच्या कामाला सुरूवात होतेय. माझ्या देखील राजकीय जीवनातला हा महत्त्वाचा असा प्रकल्प आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

- Advertisement -

गेल्या अनेक वर्षात अनेक धोकादायक इमारती कोसळून हजारो लोकांची जीवितहानी झालेली आहे. त्यामुळे अधिकृत-अनधिकृत इमारतींच्या पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून शक्य होऊ शकतो, अशा प्रकारची संकल्पना मी सुरूवातीला मांडली आणि सगळ्यांनीच त्याला सहकार्य केलं. त्यामध्ये अनेक प्रकारच्या त्रुटी देखील होत्या, असं शिंदे म्हणाले.

लाखो लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण होईल

जेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते. त्यावेळी काही त्रुटी दूर झाल्या. त्यानंतर मी नगरविकास विभागाचा मंत्री झालो आणि आता मुख्यमंत्री म्हणून क्लस्टर आणि पुनर्विकास हा सोपा आणि सुलभ व्हावा. यासाठी काही त्रुटी आणि अटी काढून टाकण्यात आल्या आहेत. हा प्रकल्प या धोकादायक इमारतीपुरता मर्यादित नाही. तर या योजनेमुळे एक नवीन शहर त्याठिकाणी तयार होईल. चांगले मोठे प्रशस्त रस्ते, उद्यानं, शाळा आणि रुग्णालये या क्लस्टरच्या माध्यमातून लोकांना मिळेल. त्यामुळे लाखो लोकांचं घराचं स्वप्न पूर्ण होईल, असंही शिंदे म्हणाले.

MSMमुळे  तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होईल

- Advertisement -

MSMची आठ केंद्र किमान राज्यात सुरू करण्याची विनंती आम्ही त्यांना केली आहे. त्याबाबत देखील त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली आहे. राज्यातील MSMचा विभाग आणि बँकांचं कर्ज केंद्र सरकारच्या योजनांमधून त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी छोटे-मोठे उद्योग MSMच्या माध्यमातून करता येणं अगदी सोपं आहे. त्यामुळे राज्यस्तरावर जे प्रोडक्ट तयार होतील त्याचं ब्रँडींग, मार्केटिंग आणि थेट ग्राहकांपर्यंत त्याची विक्री आपल्याला कशी करता येईल. स्थानिक स्वराज्य संस्था, जिल्हा प्रशासन याची देखील मदत घेऊन MSMची केंद्र उभी केली तर हजारो आणि लाखो तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होऊ शकते.

महिला बचत गटाचं सक्षमीकरण होईल 

महिला बचत गटाचं सक्षमीकरण या माध्यमातून होईल. त्यामुळे राज सरकारवर यावर पूर्णपणे लक्ष केंद्रीत करेल. केंद्र आणि राज्य सरकार संपूर्णपणे मिळून या योजनेला प्राधान्य देईल.जागतिक पर्यावरण दिनाच्या मी सगळ्यांना शुभेच्छा देतो. त्याच कार्यक्रमाला मी चाललोय. ग्लोबल वॉर्मिंग, क्लायमेट चेंज, अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट, हे सगळं बदललेलं ऋतुचक्र आहे. पर्यावरणाचं समतोल राखणं आणि संवर्धन करणं ही आता काळाची गरज आहे. त्यामुळे राज्य सरकारने मोठ्या प्रमाणावर याला प्राधान्य दिलंय, असं शिंदे म्हणाले.


हेही वाचा : Water scarcity : मुंबईकरांना राज्यशासनाचा दिलासा, शासनाच्या कोट्यातील पाणीसाठी


 

- Advertisment -