घरमुंबईमुख्यमंत्री राज्यपालांना भेटणार, राज्यातील सद्यस्थितीची माहिती देणार

मुख्यमंत्री राज्यपालांना भेटणार, राज्यातील सद्यस्थितीची माहिती देणार

Subscribe

जनतेच्या मनातून पोलीस दलाला उतरवण्याचे काम करणाऱ्याची गय केली जाणार नाही - अजित पवार

उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर सापडलेली स्फोटके, गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर झालेले खंडणीखोरीचे आरोप आणि पोलीस दलातील बदल्यांबाबत पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अहवालावरून विरोधी पक्षाने उडवलेली आरोपांची राळ या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे राज्यपालांची भेट घेणार आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुरुवारी याबाबत माहिती दिली. मुख्यमंत्र्यांसोबत आघाडीचे मंत्री आणि प्रमुख नेते राज्यपालांना भेटून राज्यातील सध्याची परिस्थिती आणि सरकारचे कामकाज याची माहिती देणार असल्याचे पवार यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी रश्मी शुक्ला यांच्या अहवालाबाबत गृह विभागाचे तत्कालीन अतिरिक्त मुख्य सचिव आणि आताचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना अहवाल सादर करण्याचे निर्देश दिल्याची माहिती पवार यांनी दिली. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल, बुधवारी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन राज्य सरकारकडून अहवाल मागवून तो राष्ट्रपतींकडे पाठवण्याची मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर आघाडीचे नेते राज्यपालांची भेट घेणार आहेत.

- Advertisement -

राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेला किंवा पोलिस दलाच्या कामकाजाला गालबोट लावण्याचं कोण काम करत असेल किंवा जनतेच्या मनातून पोलीस दलाला उतरवण्याचे काम कोण करत असेल तर त्यांची गय केली जाणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी यावेळी दिला.

- Advertisment -
- Advertisment -
- Advertisment -